Marathwada Election News: भाजपपेक्षा पक्षांतर्गत नाराजीमुळे राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंची धाकधूक वाढली

Marathwada Election News : सत्तेच्या काळातच आमदार काळेंकडून स्वपक्षीय नेते व जवळच्या शिक्षक संघटना दुरावल्याचं चित्र
Vikram Kale, Ncp
Vikram Kale, Ncp Sarkarnama
Published on
Updated on

दत्ता देशमुख

Marathwada Election News : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत मराठवाडा शिक्षक मतदार संघाचाही समावेश असून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार विक्रम काळे रिंगणात उतरणार आहेत. आमदार काळे यांना विरोधी भाजप उमेदवारापेक्षा पक्षांतर्गत नाराजीचाच अधिक सामना करावा लागणार असल्याचं चित्र आहे. त्यांच्या मागच्या काळातील ‘अकेला चलो रे’ची भूमिका राष्ट्रवादीतील दिग्गज संस्थाचालकांना रुचलेली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजीचा सामाना त्यांना करावा लागणार आहे.

मराठवाडा शिक्षक मतदार संघावर दिवंगत आमदार वसंतराव काळे यांचा चांगलाच पगडा होता. शिक्षक संघटनांशी संबंध, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि त्यासाठी कायम लढा देण्याच्या भूमिकेमुळे दिवंगत वसंतराव काळे पक्षापलीकडे शिक्षकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्यानंतर विक्रम काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं संधी दिली. विक्रम काळे देखील दोन वेळा आमदार राहिले. आता पुन्हा निवडणूक जाहीर झाल्यानंतर साहाजिकच विद्यमान आमदार असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मात्र, मराठवाडाभर संपर्क असलेल्या प्रदीप सोळंके यांनी उमेदवारीवर दावा करुन ट्विस्ट निर्माण केला आहे.

Vikram Kale, Ncp
Bachchu Kadu on Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंचं सूचक विधान, म्हणाले, ''यंदाच्या वर्षी...''

प्रदीप सोळंके यांचा देखील या क्षेत्रात चांगला संपर्क आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघातील कामांमुळे त्यांचा शिक्षकांशी चांगला संपर्क देखील आहे. दरम्यान, आठ जिल्ह्यांचा विस्तीर्ण मतदारसंघ असल्याने कोणा एका नेत्याला एवढा गाडा ओढणे अशक्य असते. संबंधित तालुके व जिल्ह्यातील पक्षांच्या नेत्यांच्या सोबतीने ही निवडणूक ओढत न्यायची असते. मात्र, मागच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळातच आमदार विक्रम काळेंकडून स्वपक्षीय नेते व जवळच्या शिक्षक संघटना दुरावल्याचे चित्र आहे.

Vikram Kale, Ncp
Bjp News : भाजप खासदारानं उडविला स्वपक्षीय आमदाराच्याच पॅनलचा धुव्वा

काळे यांना सत्तेच्या काळात २५/१५ सह इतर लेखा शिर्षमधून भेटलेला निधी त्यांनी संबंधित नेत्यांच्या शिक्षण संस्थांना किंवा शाळांना देण्याऐवजी कंत्राटदारांचं हित जपल्याचा आरोप आहे. स्वत:च्या आमदार स्थानिक विकास निधीतून शाळा निहाय संगणक, पुस्तके व इतर वस्तू देण्याऐवजी त्यांनी निधी एकत्र करुन एकत्रित पुस्तकांची खरेदी देखील राष्ट्रवादी नेत्यांनाच रुचली नाही. मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच अनेक नेत्यांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था असून त्यांच्या शाळांवर असलेल्या शिक्षकांच्या मतदानावर या नेत्यांचा प्रभाव आहे. मात्र, विक्रम काळे या नेत्यांपासूनच दूर आहेत.

विक्रम काळे यांनी जुनी पेन्शन, शिक्षक अनुदानाचे प्रश्न विधीमंळात मांडले असले तरी शिक्षकांसोबत रस्त्यावरच्या लढाईत ते कमी पडले. दुसरीकडे भाजपची सत्ता असल्याने त्यांचा वाढलेला हुरुप आणि संस्थाचालक असलेल्या काँग्रेसच्या किरण पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. किरण पाटील यांचा गोतावळा संस्थाचालक आणि काँग्रेस - राष्ट्रवादीचाच असल्याने या मंडळींकडून किरण पाटलांना छुपी मदत होण्याची दाट शक्यता आहे. त्यात भाजपने सत्तांतरानंतर शिक्षकांबाबत घेतलेल्या निर्णयांचे क्रेडीट किरण पाटील यांना मिळावे, यासाठी जाणीवपूर्णक प्रयत्न केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com