Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगमधील गुंडांचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणातही वाल्मीक कराड आणि त्याच्याच गँगचा हात असल्याचा आरोप विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला. यातून आता गोट्या गित्ते याचे नाव प्रामुख्याने चर्चेत आले आहे. सध्या फरार असलेल्या गोट्या गित्तेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
गोट्या गित्ते याची फक्त परळीच नाही तर बीड, लातूर, परभणीसह पुण्यातही दहशत होती. या प्रत्येक जिल्ह्यात गोट्या गित्ते याच्यावर गंभीर स्वरुपाचे तब्बल 16 गुन्हे नोंद आहेत. वाल्मिक कराड माझे दैवत आहे, माझ्यावर खोटे आरोप लावू नका, असे आवाहन करत आत्महत्येची धमकी देत रेल्वे रुळावर बसलेल्या गोट्या गित्ते याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. गित्ते यांच्यावर किती गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, याची यादीच समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून व्हायरल केली आहे.
त्यानूसार गोट्या गित्ते याच्यावर ग्यानोबा उर्फ गोट्या मारोती गित्ते रा. नंदागौळ, ता. परळी वैजनाथ याच्यावर एकट्या परळीतच 9 गुन्हे दाखल आहेत. यात प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय उदगीर, केज, लातूर, परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गोट्या गित्ते याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. स्वारगेट, चिंचवड या पुण्यातील पोलीस स्टेशनमध्ये गोट्या गित्ते याच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे. वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या गँगमधील गोट्या गित्ते हा महत्वाचा आणि सायको किलर असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला होता.
एखाद्या व्यक्तीचा खून करायचा असेल तर त्याला आधी फोनवरून धमकावणे, त्याच्या घरासमोर जाऊन श्राध्द घालण्याचा विधी करण्याचे प्रकार गोट्या गित्ते करायचा, असा दावा बाळा बांगर यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना गोट्या गित्ते याने फोनवरून धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली होती.
व्हायरल व्हिडिओने खळबळ
गोट्या गित्तेने एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा तो यात देताना दिसला. वाल्मिक कराड म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे, तर बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गित्तेने पोलिसांना शरण यावे, असे आवानह करतानाच माझ्यावर आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी हे आरोप थांबवावेत. अन्यथा मी आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार आव्हाड असतील असा इशारा गोट्याने यातून दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.