Hingoli ZP school : राज्यातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेवरून काॅक्रोच जनता पार्टी या उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी थेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना आमचे व्होट पाहिजे असतील, तर अगोदर आमच्या सरकारी शाळा सुधाराव्या लागतील, असा इशारा दिला.
नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी जेवढी मेहनत घेत आहात, तेवढेच राज्यातील सरकारी शाळांसाठी करा, दर्जेदार शिक्षण द्या, शिक्षक द्या, अशीही मागणी अभिजीत दिपके यांनी केली.
अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना आजपासून भेटी देण्यास सुरूवात केली आहे. हिंगोलीतील लिंबाळा एमआयडीसी शाळेला भेट दिली होती, त्यावेळी शाळेतील (School) मुख्याध्यापक नशेत झोपला होता. तसा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. अभिजित दिपके यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून तातडीने कारवाईची मागणी केल्यावर, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
नशेत असलेल्या गावकऱ्यांनी पाच वेळेस निवेदन दिले होते, तरीही संबंधित नशेबाज मुख्याध्यापकाला काढण्यात आले नव्हते. का नव्हते काढण्यात आले? असा प्रश्न करत शिक्षणाधिकाऱ्यांचे (Education) मुले या शाळेत, जर शिकत असते, तर एखादा दारूच्या बाटल्या घेऊन बसलेल्या मुख्याध्यापक यांनी सहन केले असता का? मग गावकऱ्यांनी का सहन करावा? असा प्रश्न अभिजीत दिपके यांनी केला. गावकऱ्यांनी पाच वेळा निवेदन दिले होते. त्यावेळेस का कारवाई करण्यात आली नाही? शिक्षणाधिकारी झोपले होते का? आता आंदोलन बसल्यानंतर यांना जाग कशी काय आली? असाही सवाल केला.
या अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळेमध्ये असतात. सरकारी शाळा संभाळण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांचीच आहे. त्यांची ही मुले सरकारी शाळेत असली पाहिजेत, जेवढेही शिक्षणाधिकारी आहेत, त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत टाकले पाहिजे. मग कळेल या गावकऱ्यांच्या मुलांना काय सहन करावे लागते, असा घणाघात अभिजित दिपके यांनी केला.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली आहेत. तरीही शाळेतील मुलांना आजही स्वच्छ पाणी मिळत नाही, बसायला बेंचेस नाहीत, वॉशरूम नाहीत, ब्लॅक बोर्ड नावाचा प्रकार नाही, भिंतीला काळा रंग लावून, त्यावर शिकवले जाते. मग तुम्ही कसले विश्वगुरू? इतर देशात जाऊन दावे करण्यापेक्षा या मूलभूत आणि हक्काच्या मुद्द्यावर अगोदर काम करा, अशा शब्दात अभिजीत दिपके यांनी सुनावले.
'जेन-झी' आता काही मुद्दे उचलत आहेत. शाळेतील आणि शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रिपोर्टिंग स्वत: करत आहे. यावर बोलताना अभिजित दिपके यांनी मुख्य प्रवाहातील मीडिया हे मुद्दे उचलत नाही. त्यामुळे आपले मुद्दे स्वतःच उचलत आहेत. मुख्य प्रवाहातील मीडिया हे हिंदू-मुस्लिम करण्यातच गुंतला आहेत. असे करण्याने शाळांची परिस्थिती बदलणार आहे का? मुख्य प्रवाहातील माध्यमे जनतेचे आवाज बनणार नाही, तर जनता स्वतःच आवाज बनेल आणि विद्यार्थ्यांनी देखील तेच सुरू केले आहे. मुख्य माध्यमांकडून अपेक्षा करणे जनतेने आता सोडून दिलेले आहे, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले.
सोशल मीडिया खाते बंद करण्याचे प्रकार आपल्याबाबत घडत आहे. यावर अभिजीत दिपके यांनी, ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो तेच हे धंदे करत आहेत. मी सर्वसामान्य प्रश्नांवर काम करतो आहे. शाळेच्या शिक्षणाच्या मुख्य गोष्टी उचलून धरत आहे. जर सरकारी शाळा व्यवस्थित झाल्या, तर यांच्या प्रायव्हेट शाळा बंद पडतील. डोनेशन घेता येणार नाही. त्यांच्या ट्रस्ट बंद पडतील. त्या कशा काय चालतील? यांना त्याचा त्रास आहे आणि हे सत्तेत बसलेले लोक आहेत, असे थेट म्हटले.
शाळेत शिक्षक नाही. परंतु नाशिक मध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यावर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. परंतु शाळा, शिक्षण व्यवस्था, सरकारी शाळांमध्ये गरीबाचे मुलं शिकतात, याकडे लक्ष वेधत, तुम्ही कुंभमेळ्यासाठी जेवढे करत आहात, तेवढेच सरकारी शाळांसाठी करा. पॉलिटिकल रॅली असते, तेव्हा तुम्ही रस्ते स्वच्छ करताना, बॅनरबाजी करता, त्याच पद्धतीने सरकारी शाळा झाल्या पाहिजेत, जर तुम्ही आमच्या शाळा नीट करणार असाल, तरच आमची मतदान तुम्हाला मिळेल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील त्यांच्या मित्रपक्षांनी लक्षात घ्यावे, असा इशारा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.