Ambadas Danve In Panvel, News
Ambadas Danve In Panvel, News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve In Panvel : नैना प्रकल्पातून सरकार भांडवलदारांना प्रोत्साहन देतयं ; लढा तीव्र करणार..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : पनवेल येथे नैना प्रकल्प राबवून सरकार एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करून भांडवलदारांना प्रोत्साहन देतेय, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. (Ambadas Danve In Panvel) तर प्रकल्प बाधितांना जागेचा योग्य मोबदला मिळावा या स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी नैना प्रकल्प बाधितांचा लढा तीव्र करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

दानवे यांनी आज पनवेल येथील विहिघर नेरे पाली येथे नैना प्रकल्पग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच नैना प्रकल्प उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांच्याकडून प्रकल्प बाधित जागेची माहिती घेतली. (Shivsena) नैना प्रकल्प व अलिबाग विरार कॉरिडोअर प्रकल्पाबाबत दानवे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेतली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना ६० टक्के मोबदला देत नाही. (Marathwada) सरकार सिडकोच्या माध्यमातून स्थानिक भूमीपुत्रांची लूट करते आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना कमी मूल्य असलेल्या जमिनी द्यायच्या असे प्रकार सुरू आहेत. (Maharashtra) दुसरीकडे बिल्डरांना जास्त मूल्याची जागा सिडको देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

यामुळे याबाबत एकत्रित धोरण अवलंबण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांवर बळजबरी करून व पोलीस बळाचा वापर करून सरकार हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करतेय. मात्र याविरोधात आवाज उठवून हा लढा आणखी तीव्र करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी प्रकल्प बाधितांना दिली. विरार अलिबाग कॉरिडोअरच्या बाधित मालमत्ता आधीच राजकीय नेत्यांनी, बिल्डरांनी कमी भावात खरेदी केल्या.

या प्रकल्पात कमी बाधित मालमत्ता व्हावी, तसेच जमीनाचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी भूमिका दानवे यांनी व्यक्त मांडली. या दोन्ही प्रकल्पाबाबत विधिमंडळ सभागृहात आवाज उठवणार व स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT