Gram panchayat Election Results Sarkarnama
मराठवाडा

Gram Panchayat Election Results : पैठणमध्ये भुमरेंचा ठाकरे गटाला धक्का, वडवाळीच्या सरपंच पदावर बाजी...

Shivsena News : ग्रामपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यातील वडवाळी ग्रामपंचायतीची ही निवडणूक होती.

Jagdish Pansare

Marathwada Political News : राज्याचे रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील वडवाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकाने बाजी मारली. (Gram panchayat Election Results) जिल्हा दूध संघाचे संचालक व भुमरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे नंदलाल काळे यांच्या पत्नी स्वाती काळे यांनी विजय मिळवला.

स्वाती काळे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिभा खोपडे यांचा पराभव केला. (Paithan) पैठण तालुक्यातील वडवाळी सरपंच पदाच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. काल झालेल्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी वडवाळी येथे उत्साहात मतदान झाले होते. (Shivsena) यापूर्वी झालेल्या दोन टप्प्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीतही मंत्री भुमरे यांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायती राखत आपले वर्चस्व सिद्ध केले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने संदीपान भुमरे आणि त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. (Marathwada) स्वतः आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघात दौरे करत भुमरे व त्यांच्या समर्थकांवर जोरदार हल्ला चढवला होता. यानंतरही भुमरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला प्रभाव कायम ठेवला.

काल झालेल्या वडवाळी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली. यात भुमरे यांचे कट्टर समर्थक नंदलाल काळे यांच्या पत्नी स्वाती काळे यांनी विजय मिळवत ठाकरे गटाला धूळ चारली. स्वाती काळे यांना ७१० मते मिळाली, तर ठाकरे गटाच्या प्रतिभा खोपडे यांना ६४२ मते मिळाली. ग्रामपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यातील वडवाळी ग्रामपंचायतीची ही निवडणूक होती.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील ही निवडणूक असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. या विजयाने भुमरे यांनी मतदारसंघावरील मजबूत पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे गटाने बाजी मारल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला या निवडणुकीत मर्यादित यश मिळत असल्याचे चित्र आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT