Nagar Gram Panchayat Election Result : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेड या त्यांच्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. कर्जत तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायती तर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायती अशा एकूण 9 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती.
यामध्ये कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून, सर्वच्या सर्व सहाही ठिकाणी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे, तर जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमधील दोन ग्रामपंचायती या आमदार रोहित पवार यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे आल्या असून, एक ग्रामपंचायत ही भाजपचे राम शिंदे यांच्याकडे गेली आहे.
एकूण कर्जत-जामखेड मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतपैकी सात ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे राम शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे, पण रोहित पवारांना मात्र अपयशाचा सामना करावा लागला आहे. निश्चितच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कर्जत-जामखेडमधील लागलेला निकाल आमदार रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
जामखेड एकूण जागा 3
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) आ.रोहित पवार - 2
भाजप आ.राम शिंदे -1
कर्जत एकूण जागा 6
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आ.रोहित पवार - 0
भाजप आ.राम शिंदे -6
याशिवाय संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाने विजय मिळवला आहे. या ठिकाणी नरेंद्र ऊर्फ अमोल गुंजाळ बहुमताने सरपंचपदी विजयी झाले, पण विखे-पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर, श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी ग्रामपंचायतीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे अजित लकडे बहुमताने विजयी झाले.
नगर तालुक्यात अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अरणगाव ग्रामपंचायतीवर आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मैदान मारले आहे. लंके गटाने अरणगावमध्ये महायुतीचा धुव्वा उडवला असून, पोपट पुंड हे सरपंचपदी विजयी झाले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.