Marathwada Grampanchayat Election News, Aurangabad
Marathwada Grampanchayat Election News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Grampanchayat Election : पराभव जिव्हारी, समर्थकांकडून मिरवणूकीवर दगडफेक; १३ जणांवर गुन्हा

सरकारनामा ब्युरो

Lautr District News : राज्यातील साडेसात हजाराहून अधिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. परंतु त्यानंतर अनेक भागात विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या समर्थकात राडा झाल्याच्या घटना समोर येत आहेत. (Latur District) लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तांबाळा ग्रामंपचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पॅनलच्या मिरवणूकीवर पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.

या दगडफेकीत काहीजण जखमी झाले असून पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांबाळा ग्रामपंचायत निवडणुकीचा (Grampanchayat Election) निकाल मंगळवारी जाहीर झाला. गावात विजयी उमेदवाराची मिरवणूक काढण्यात आली होती. (Fir Filed) मिरवणूक सुरू असतांना अचानक दगडफेक सुरू झाली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून पाच आरोपीना अटक देखील करण्यात आली आहे. निलंगा येथून विजयी उमेदवार गावात आल्यानंतर गावातील बस्वराज संगप्पा पाटील याच्यासह अन्य १२ साथीदारांनी अचानक दगडफेक करून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या दगडफेकीत कार, जीप, व बुलेटचे नुकसान झाले.

निलंगा तालुक्यातील ६८ गावच्या ग्रामपंचायत निकालात अनेक गावात धक्कादायक निकाल लागले. दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागल्याने काही प्रमाणात धुसफूस होती. तांबाळा गावात पॅनल पडल्याचा रागातून बारा-तेरा जणांच्या टोळक्याने विजयी उमेदवारांच्या घरावर आणि गाड्यावर दगडफेक करून नुकसान केल्याचे समजते. गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT