Aurangabad : परदेशी पाहुण्यांसमोर शोभा नको, पर्यटन स्थळाजवळील अतिक्रमणे हटवा..

Aurangabad : जी-२० शिखर परिषदेचे सहभागी प्रतिनिधी ९ व १० फेब्रुवारी आणि २२ व २३ मे, रोजी शहराला भेट देणार आहेत.
Collector Visit Fort Area News, Aurangabad
Collector Visit Fort Area News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

G-20 Conference News : दौलताबाद किल्ला परिसरातील अतिक्रमण संबंधितांनी ३१ डिसेंबर पर्यंत स्वतः हून काढून घ्यावीत, नसता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. जी-२० परिषदेच्या अनुषंगाने (Collector) जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी परिसरातील अतिक्रमणाची पाहणी केली.

Collector Visit Fort Area News, Aurangabad
Prashant Bamb : कृषीमंत्री साहेब, माझ्या मतदासंघातले मका संशोधन केंद्र पळवू नका..

तसेच या परिसरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. (Marathwada) वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमण काढून त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत नियोजन करावे, येथील एमटीडीसीच्या मालकीच्या असणाऱ्या पार्किंगमध्ये वाहने लावण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी वेरूळ येथून जाणाऱ्या बायपासच्य जागेची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. जी-२० शिखर परिषदेचे सहभागी प्रतिनिधी ९ व १० फेब्रुवारी २०२३ आणि २२ व २३ मे, रोजी औरंगाबाद (Aurangabad) शहराला भेट देणार आहेत.

वेरुळ, अजिंठा लेण्यांसह विविध पर्यटन स्थळांना देखील ते भेट देणार आहेत. भारत, इटली व इंडोनशिया हे तीन देश जी-२० परिषदेचे आयोजन करत असून औरंगाबाद येथे जगभरातील ४० देशातून सुमारे ५०० प्रतिनिधी भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com