Grampanchayat News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Grampanchayat : संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्यासाठी पाच लाखाची खंडणी ; पत्राने खळबळ..

Marathwada : ग्रामपंचायत निवडणुकीत तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही, असा उल्लेख केलेला आहे.

सरकारनामा ब्युरो

Beed News : ग्रामपंचायत निवडणुकीत पडल्याचा राग मनात धरून नगर पोस्टातून एका कुटुंबाला आलेल्या धमकी पत्राने खळबळ उडाली आहे. (Grampanchayat) पत्रात संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा उल्लेख असल्याने ऊसतोड कामगार भयभीत झाले आहेत.

निवडणूक झाली पण प्रचारातील कटुता, निकालातील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. (Beed News) याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तात्रय गहिनीनाथ औटे हे आष्टी तालुक्यातील नांदा येथील रहिवासी असून ऊसतोड मुकादम म्हणून काम करतात. (Marathwada)

शुक्रवारी (ता. ३०) डिसेंबर रोजी नगर पोस्टातून एक निनावी बंद पाकीट त्यांना प्राप्त झाले. पाकिट उघडल्यानंतर त्यात दत्तात्रय औटे यांच्यासह त्यांचे आई, वडील यांना जिवे मारण्याची धमकी असलेले पत्र आढळून आले.

कुटुंब संपविण्यासाठी पाच लाख रूपयांची सुपारी दिल्याचे त्यात नमूद आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तुमच्यामुळे माझा मुलगा सरपंच झाला नाही, असा उल्लेख केलेला आहे. या निनावी पत्राने औटे कुटुंब भयभीत झाले आहे.

या प्रकरणी अज्ञाताविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात दत्तात्रय गहिनीनाथ औटे यांच्या फिर्यादीवरून रविवारी (ता. एक) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT