Pankaja Munde, Dhananjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंचं परळीत 'ग्रँड वेलकम'! बॅनरवर झळकले गोपीनाथ मुंडे,शरद पवार, पंकजा मुंडे !

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे -

Parali : शिंदे - फडणवीस सरकारमध्ये थेट सहभागी होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचवेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या आठही आमदारांचं त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यात धनंजय मुंडे यांच्या स्वागताच्या बॅनरवर परळीत दिवंगत गोपीनाथ मुंडे,शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी (दि.13) धनंजय मुंडे(Dhananjay Munde) हे आपल्या परळी मतदारसंघात जात आहेत. त्यांची जाहीर सभा देखील आहे. मुंडे मतदारसंघात असतानाच परळीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर गोपीनाथ मुंडे, पंडित आण्णा मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचेही फोटो झळकवले आहेत.

धनंजय मुंडे परळीत जात असताना गुरुवारी (दि.१३) पहाटे नगर शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी होते. सकाळी कडा-आष्टी (जि. बीड) निघताना नगरच्या विश्रामगृहावर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देत मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर मुंडे यांना भेटायला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात भाजप(BJP), शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे सरकार आलेले आहेत. साहजिकच या तीनही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. जर कार्यकर्त्यांना त्यात आनंद मिळत असेल तर आपणही त्यांच्या आनंदात सहभागी झाले पाहिजे असंही मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या गटात सामील होत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर 2024 ला परळीत उमेदवारीवरून आता चर्चा सुरू झाली आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार आणि मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना उमेदवारी असेल तर पंकजा मुंडें(Pankaja Munde)च्या उमेदवारीचे काय असा प्रश्न कार्यकर्त्यांत आणि राजकीय विश्लेषकांत आहे. तसेच राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर शरद पवार यांनीही माझा फोटो जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर कुणीही वापरू नये असे सुनावले आहे.

माझ्या बॅनरवर यापूर्वीही गोपीनाथ मुंडे यांचे अनेकदा फोटो कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. मात्र, त्यावेळी माध्यमांनी कधी विचारले नाही, आज मात्र विचारले अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी नगरमध्ये केली.

मंत्रिमंडळ व खातेवाटपावर मुंडे म्हणाले..?

धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर मला याबाबत काही माहिती नसून याबद्दलची माहिती मुंबईतूनच मिळेल असे सांगत याबाबत अधिक बोलणे टाळले. तसेच परळीच्या जनतेने नेहमीच माझ्यावर प्रेम केले आहे, अनेक माझ्यावरील संकटाच्या काळात त्यांनी मला साथ दिली आहे. त्यामुळे आज पुन्हा मंत्री म्हणून परळीत जात असताना जनतेला आणि मलाही आनंद वाटत असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT