Anandacha Shida News, Chhatrapati Sambhajinagar
Anandacha Shida News, Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Gudhi padva News : `आनंदाचा शिधा`, आला पण निम्माच, त्यातही तेल गायब..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : दिवाळी प्रमाणेच गुडीपाडवा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयतीला घरोघरी `आनंदाचा शिधा`, (Anandacha Shida) पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. परंतु जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका या आनंदाचा शिधा योजनेला बसला आहे.

काल उशीरा आनंदाचा शिधा पाकीट पुरवठा विभागाला मिळाली. परंतु मागणीपेक्षाची निम्मीच होती, त्यातही तेल नसल्याने त्याचे वाटप करता आले नाही. (Eknath Shinde) त्यामुळे सरकारचा उद्देश जरी चांगला (Marathwada)असला तरी त्यांची अंमलबाजवणी व्यवस्थीत होत नसल्याने या योजनेचा लाभ होतांना दिसत नाहीये.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाडव्याच्या एक दिवस आधी आनंदाचा शिधा पोहचणे अपेक्षित होते. जिल्ह्यात एकून अठराशे रेशन दुकाने आहेत, तर शिध्यास पात्र असलेल्या रेशनकार्ड धारकांची संख्या साडेपाच लाखांच्या वर आहे. पाडवा गोड व्हावा यासाठी हा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

काल मागणीच्या ५० टक्के आनंदाचा शिधा पाकीटे पुरवठा विभागाला मिळाली. साखर, रवा, चनाडाळ या वस्तू त्यात असल्या तरी तेलाचे पाकीट नसल्याने त्याचे वाटप देखील करता आलेले नाही. त्यामुळे कदाचित पाडव्यानंतरच याचे प्रत्यक्ष वाटप हे रेशन दुकानांवरून केले जावू शकेल.

आनंदाचा शिधा मिळावा यासाठी पुरवठा विभागाने आधीच सरकारकडे मागणी नोंदवली होती. परंतु संपामुळे शिधा पाकीट वेळेत मिळाली नाही. परिणामी गुडा पाडव्याला सामान्यांना शिध्याचा आनंद मिळालाच नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT