Gunratrna Sadavarte News  Sarkarnama
मराठवाडा

Gunratna Sadavarte On Aurangjeb : औरंगजेबाची कबर काढून समुद्रात नेवून फेका..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : औरंगजेब, अजमल कसाब हे देशात कधीच प्रेरणा व वैचारिक स्थान होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या लष्कराने ओसामा बिन लादेन याचे प्रेत मध्य समुद्रामध्ये फेकले होते त्याचप्रमाणे अशा प्रवृत्तीच्या लोकांची कबर देखील समुद्रत नेऊन फेका.(Gunratna Sadavarte On Aurangjeb) म्हणजे वारंवार कोणी या कबरीवर पुष्प अर्पण करणार नाही, असा टोला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नाव न घेता असदुद्दीन ओवैसी, प्रकाश आंबेडकर यांना लगावला.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल खुलताबाद येथील औरंगजेब कबरीला भेट दिली. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आपले मत व्यक्त केले. देशातील लव जिहाद पेक्षा व्हाॅट्सअप जिहाद अधिक भयंकर असल्याचेही ते म्हणाले.

देशात सध्या सेक्युलर, रोखठोक अशा व्हाट्सअप ग्रुपद्वारे देशातील नागरिकांची डोकी भडकवली जात आहेत. (Aurangabad) यामुळे लव जिहाद पेक्षा व्हाट्सअप जिहाद हा भयंकर बनत चालला आहे. संगवी, ओसामा बिन लादेन, दाऊद अशा विचारांची माणसे परदेशात बसून हे व्हाट्सअप ग्रुप चालवत आहेत. (Maharashtra) यामुळे देशामध्ये विघटन करणारी शक्ती वाढली आहे. भारत देशात यांचे कोणाशी लागेबांधे आहेत, याची चौकशी करा, अशी मागणी देखील सदावर्ते यांनी केली.

एसटी बॅंक निवडणुकीच्या विषयावर बोलतांना सदावर्ते म्हणाले, एसटी बँकेच्या निवडणुकीत ६४ हजार सदस्य असून ४८ मतदार हे एसटी कष्टकरी जन संघाशी निगडित आहेत. एसटी बॅंकेत शरद पवार वैचारिक वायरस निर्मूलनासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. शरद पवार यांचा वैचारिक वायरस विविध क्षेत्रात पसरला असून एसटीच्या बँकेतही तो शिरलेला आहे. कारण या बँकेची नाडी शरद पवारांच्या हाती होती. कष्टकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या विचारांना नाकारलं, डंके की चोट पर येथील आमदारांनी चले जाव, असे म्हणत शरद पवारांच्या सरकारला पाडलं.

त्याचप्रमाणे एसटी बँकेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या वैचारिक वारसाला चले जाव, करण्यासाठीचा हा लढा कष्टकरी जन संघाने हाती घेतला आहे. पवारांच्या हाती सुत्र असतांना त्यांनी सदस्यांना बॅंकेच्या कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. क्रेडिट कार्ड सुद्धा उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे हा लढा वर्षानुवर्षे शरद पवार यांच्या विचारांवर चालणाऱ्या जिल्हा बँकेतील व्यक्तींच्या म्हणजेच सावकारी विरुद्ध कष्टकरी, असा असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. एसटी कष्टकरी जनसंघ जनतेमध्ये आली असून आम्ही निवडून येवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT