Demand Of Independent Marathwada News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Gunratna Sadavarte : `डंके की चोटपर` स्वतंत्र मराठवाडा राज्य घेणार..

Aurangabad : मराठवाडा आणि विदर्भ ही छोटी राज्य म्हणण्यापेक्षा स्वतंत्र राज्य निर्माण झाली पाहिजेत

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : मराठवाड्यावरील अविकसितपणाचा कलंक आणि दारिद्रपणा कायमचा नाहीसा करण्यासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य तयार करण्याची मागणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली. आता यासाठी Marathwada `मराठवाडा राज्य निर्मिती समिती` तयार करण्यात आल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले की, मराठवाड्याला नेहमीच दुय्यम वागणूक मिळाली आहे. सुशिक्षित बेरोजगारांवर रोजगारासाठी मराठवाड्याबाहेर जायची वेळ आली. विकासासाठी समर्पक निधी दिला गेला नाही. (Aurangabad) यामुळे मराठवाड्याला अविकसितपणाचा कलंक लागला आहे. मराठवाड्याला सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी मराठवाडा स्वतंत्र राज्य होणे अत्यंत गरजेचे आहे, याच मागणीसाठी सातत्याने संघर्ष गतिमान केला जाणार आहे.

मराठवाडा आणि विदर्भ ही छोटी राज्य म्हणण्यापेक्षा स्वतंत्र राज्य निर्माण झाली पाहिजेत, त्यांचा कारभार स्वतंत्रपणे चालला पाहिजे. त्या भागातील मागासलेपण संपवण्याकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून नवीन राज्य निर्मिती रचनेनूसार मराठवाडा आणि विदर्भ स्वतंत्र राज्य झाले पाहिजे, अशी मागणीही अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

स्वंतत्र मराठवाडा राज्याच्या मागणीसाठी एक समिती गठीत करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी एकमताने आपली निवड झाल्याचेही सदावर्ते यांनी जाहीर केले. महापुरुषांची नावे एकेरी उच्चारली जात आहेत. शिवसेनेचे नेते संभाजीनगर असा एकेरी उल्लेख करताय, त्यांनी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख यापुढे करावा असे आवाहन केले.

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्यासाठी मागणी करण्यात येईल. पुण्यात आयोजित करण्यात आलेला मूक मोर्चा हा बेकायदेशीर आहे. तसेच या मोर्चात सहभागी झालेल्यावर कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच केली असल्याचे सदावर्ते यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT