Shivsena News: उद्धवसेनेकडून राष्ट्रवादी, भाजपला दणका ; चिकटगांवकर, भुमरेंनी बांधले शिवबंधन..

Marathwada News: सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवणार असल्याचा शब्द ठाकरे यांना दिला.
Ex.Mla, Bjp Leaders Join Shivsena News, Aurangabad
Ex.Mla, Bjp Leaders Join Shivsena News, AurangabadSarkarnama

Aurangabad News : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा सुरू आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. Shivsena अशावेळी जिल्ह्यातील उद्धवसेनेने राष्ट्रवादी आणि भाजपला जोरदार दणका दिला आहे. वैजापुरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, पैठण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज हाती शिवबंधन बांधले.

Ex.Mla, Bjp Leaders Join Shivsena News, Aurangabad
Grampnchayt Election : पद्मसिंह पाटलांच्या तेरमध्ये तिरंगी लढत ; केजरीवालांची `आप`ही मैदानात..

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी मुंबई मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला. (Uddhav Thackeray) जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. (Aurangabad) नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परिवारात स्वागत केले.

यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, ऍड. प्रतापराव पाटील निंबाळकर, (तालुका अध्यक्ष पंचायत समिती), प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती, कृ. उ.बा.स.यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी प्रमाणेच जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात देखील भाजपला सुरूंग लावण्यात उद्धवसेनेला यश आले आहे.

भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. वैजापूर, पैठण प्रमाणेच गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत हजारो कार्यकर्त्यांचा लवकरच जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.आज शिवबंधन हाती बांधलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवणार असल्याचा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com