Nanded District Bank 
मराठवाडा

Nanded Bank: नांदेड जिल्हा बँकेचे निम्मे संचालक बसणार घरी? सहकार कायद्याच्या नवा नियम येणार आडवा; आता वारसांसाठी धडपड सुरु

Nanded Bank: जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू आणि सत्तेच्या चाव्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या हाती ठेवण्याचे प्रयत्न बडे बडे नेते वर्षानुवर्षे करत आले आहेत.

Jagdish Pansare

Nanded Bank: जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू आणि सत्तेच्या चाव्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या हाती ठेवण्याचे प्रयत्न बडे बडे नेते वर्षानुवर्षे करत आले आहेत. अर्थात याचे परिणाम मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश जिल्हा सहकारी बँका डबघाईत जाण्यात झाला, असं असलं तरी संचालक मंडळात जाण्याचा मोह नेत्यांना सोडता सोडवत नाही.

पण यावर आता सहकार कायद्यातील नवे नियम आणि तरतुदीमुळेच चाप बसण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकी आधीची शेवटची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत येत्या 3 एप्रिल रोजी संपत आहे. या सभेत एकूण 28 ठराव मंजूर करण्यात आले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिले जाते.

निवडणुकीची लगबग सुरू असली तरी विद्यमान संचालक मंडळातील अनेक दिग्गजांना सहकार विभागाच्या नव्या नियमाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताच्या संचालक मंडळातील 8 जणांना पुन्हा येता येणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशावेळी आम्ही नाही तर आमच्या वारसांना किंवा नात्यातल्याही लोकांना संधी मिळाली पाहिजे, यासाठी अनेक संचालकांनी फिल्डिंग लावायला सुरूवात केल्याची माहिती आहे.

खतगावकर, चिखलीकरांना नो एन्ट्री?

बँकेचे विद्यमान अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांना बँकेची निवडणूक लढण्यात नव्या नियमाची अडचण ठरू शकते. अशावेळी बँकेत आपल्या घरातील प्रतिनिधी असला पाहिजे यासाठी स्नुषा मिनल खतगावंकर यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर हे दोघे दहा वर्षापासून लोहा व कंधार सेवा सहकारी सोसायटीतून बँकेवर निवडून आलेले आहेत, आता त्यांची संधी हुकणार आहे.

माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर पुन्हा संचालक मंडळात येऊ शकणार नाहीत, पण त्यांचे चिरंजीव मुकेश पाटील हे निवडणूक लढवू शकतात. बँकेच माजी उपाध्यक्ष दिवंगत हरिहरराव भोसीकर यांचे पुत्र शिवकुमार यांची काही महिन्यापुर्वीच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात एन्ट्री झाली होती. त्यामुळे ते पुन्हा निवडणूक लढवू शकतात. तर गोविंदराव नागोलीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेब रावणगावकर, दिनकर दहिफळे या विद्यमान संचालकांना येणारी निवडणूक लढवता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT