Baramati bypoll : काँग्रेससह तीन राष्ट्रीय पक्ष संपर्कात; हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीत आणला ट्विस्ट

Laxman Hake statement : निवडणुक लोकशाहीच्या पद्धतीने झाली पाहिजे. सहानुभूती म्हणून निवडणुका बिनविरोध होऊ शकत नाही, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
Laxman Hake, Sunetra Pawar
Laxman Hake, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सत्ताधारी पक्षासह अन्य काही पक्ष आग्रही आहेत. असं असतानाही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे.

सुरुवातीला बारामती पोटनिवडणुकीमध्ये स्वतः लक्ष्मण हाके निवडणूक मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता आंदोलनातील एखाद्या कार्यकर्त्याला या निवडणुकीत उतरवण्याबाबत सुतोवाच त्यांनी केला आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

याबाबत लक्ष्मण हाके यांनी सांगितलं की, बारामती व राहुरी पोटनिवडणूक आम्ही स्वतः लढू किंवा चळवळीतला एखादा पदाधिकारी उभा करू. याबाबतचा निर्णय आम्ही घेणार असून येत्या दोन दिवसांमध्ये तो जाहीर करू. नेमकं कोण उमेदवार असेल याबाबतचा निर्णय बैठक घेऊन फायनल करणार असल्याचं हाके यांनी सांगितलं.

Laxman Hake, Sunetra Pawar
Eknath Shinde Shiv Sena : निवडणुका संपताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उलथापालथ; उदय सामंत, राणे, ज्योती वाघमारे, गोगावले, म्हस्केंची टीम सज्ज...

हाके पुढे म्हणाले, निवडणुक लोकशाहीच्या पद्धतीने झाली पाहिजे. सहानुभूती म्हणून निवडणुका बिनविरोध होऊ शकत नाही. यापूर्वी देखील अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि रमेश वांजळे यांच्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार दिलेले होते. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही.

ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध कार्यकर्ता अशी निवडणूक होणार आहे. वेळप्रसंगी मी उमेदवार होईल अथवा नाही मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. सहानुभूतीच्या जोरावर निवडणुका बिनविरोध होत असतील तर हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. लोकशाहीत निवडणुकीला काय महत्त्व हे प्रगल्भ नागरिकांना माहीत आहे, असे हाके म्हणाले.

Laxman Hake, Sunetra Pawar
Teachers recruitment : राज्यात 2017 नंतर झालेल्या शिक्षक भरतीचे होणार ऑडिट; हायकोर्टाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने काढला जीआर

बारामती पोट निवडणुकीसाठी अनेक राष्ट्रीय पक्ष आमच्या संपर्कात आहेत. यामध्ये आप, बसपा आणि काँग्रेस सारखे पक्ष आहेत. या पक्षांनी अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतर आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. यामध्ये स्थानिक पक्षाने देखील आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. ‘ये अंदर की बात है बहुत लोक हमारे साथ है’, असं हाके म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com