Bajirang Sonwane-Harshada Sonwane
Bajirang Sonwane-Harshada Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Beed : राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षाची डॉक्टर लेक आता ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावणार

सरकारनामा ब्यूरो

बीड : वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेताना (एमबीबीएस) नगर पंचायत निवडणुक लढविणाऱ्या डॉ. हर्षदा बजरंग सोनवणे (Harshada Sonwane) आता डॉक्टर पदवी हाती घेऊन ग्रामपंचायतीच्या (Gram panchayat) रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा सामना प्रविणा संतोष सोनवणे यांच्याशी होईल. (Harshada Sonwane will contest for post of Sarpanch in Anandgaon Gram Panchayat elections)

जानेवारी महिन्यात झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी वैद्यकीय पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या कन्या डॉ. हर्षदा यांना निवडणुक रिंगणात उतरविले होते. त्यावेळी बजरंग सोनवणे (Bajirang Sonwane) राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्या निवडणुकीत डॉ. हर्षदांना पराभवाचे तोंड पहावे लागले होते. मात्र, वैद्यकीय पदवीत त्यांनी घवघवीत यश मिळविले.

आता जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात सोनवणेंच्या केज तालुक्यातील सारणी (आनंदगाव) ग्रामपंचायतीची निवडणूकही होत आहे. अनेक वर्षांपासून ही ग्रामपंचायत बजरंग सोनवणे यांच्या ताब्यात आहे. परिसरातच त्यांचा येडेश्वरी शुगर हा कारखाना देखील आहे. गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी कन्या डॉ. हर्षद सोनवणे यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली आहे.

डॉ. हर्षदांचा सामना प्रविणा संतोष सोनवणे यांच्याशी असेल. प्रविणा सोनवणे देखील पदवीधारक असून त्यांनीही संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य म्हणून काम करताना गावातील निराधारांना निवृत्तीवेतनाचे लाभ दिले आहेत. पत्रकार पती संतोष सोनवणे देखील विविध माध्यमांतून ग्रामस्थांच्या मदतीला धावून येतात. प्रविणा सोनवणे यांच्यामागेही गंगामाऊली शुगरचे संचालक राहूल सोनवणे यांची ताकद आहे. त्यामुळे बाजी कोण मारणार, हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT