Hansraj Ahir : मागासवर्ग आयोगाची सूत्रे हाती घेताच अहिरांनी केलेले विधान भाजपला आणणार अडचणीत?

चंद्रपुरातून लोकसभेची निवडणूक हरलेले हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपतीकडून नेमणूक करण्यात आली आहे.
Hansraj Ahir
Hansraj AhirSarkarnama

मुंबई : लोकसभेची २०१९ ची निवडणूक पराभूत झालेले माजी खासदार हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने (BJP) अहिर यांना राष्ट्रीय पातळीवरील पद देऊन राजकीय पुनर्वसन केले आहे. मात्र, आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अहिर यांनी ‘महाराष्ट्र सरकारने शिफारस केली, तर मराठा (Maratha) समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण (Reservation) देण्याबाबत आयोग विचार करेल’, असे विधान केल्याने वाद वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचा फटका भाजपलाच बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Statement made by Hansraj Ahir will put BJP in trouble)

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी चंद्रपुरातून लोकसभेची निवडणूक हरलेले हंसराज अहीर यांची राष्ट्रपतीकडून नेमणूक करण्यात आली आहे. अहिर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे शुक्रवारी (ता. २ डिसेंबर) नवी दिल्लीत जाऊन घेतली. त्या वेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले. मात्र, ते त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

Hansraj Ahir
Gram Panchayat Election : या कारणांमुळे चुरस वाढली; पुण्यात सरपंचपदासाठी १०५०, तर सदस्यासाठी ५१०७ अर्ज

गेल्या काही वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. गेली पाच वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमकपणे संघर्ष करीत आहे. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलेले नाही. त्यावरून राज्यात तुंबळ आरोप-प्रत्यारोप रंगले होते. मधल्या काळात मराठा समाजाला इतर मागास वर्गातून आरक्षण देण्याचा विचार पुढे आला होता. मात्र, त्याला ओबीसींचा कडाडून विरोध झाला होता. त्यामुळे अहीर यांनी केलेल्या विधानावर ओबीसी समाज पुन्हा तुटून पडण्याची शक्यता आहे.

Hansraj Ahir
Gram Panchayat Election : सोलापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी १०६८, तर सदस्यासाठी ५८७९ अर्ज दाखल

मराठा समाजातील काही संघटनांची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे. मात्र, ओबीसींचा त्याला विरोध आहे. आता भाजपचे नेते आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनीच ‘महाराष्ट्रात मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) कोट्यातून आरक्षण द्यावे, या मागणीबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव आला तर आयोग त्यावर विचार करेल’ असे म्हटले आहे. त्यावर भाजपची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com