Marathwada : हर्षवर्धन जाधव फार फडफड करतोय, खरं बोलतोय, रोखठोक बोलतोय म्हणून मी सरकारच्या डोळ्यात खूपतोयं. २०११ च्या प्रकरणात मला मिळालेली बेल रद्द करावी म्हणून २०२२ मध्ये सरकार अर्ज करते. (Harshvardhan Jadhav News) यावरून स्पष्ट होते की ते माझ्या मागे लागलेले आहेत, मला अडकवण्यासाठी काहीही करतील. पण मी मागे हटणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, प्रामाणिकपणे काम करतच राहणार, असा निर्धार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्याविरोधात राज्य सरकारने केलेले अपील फेटाळल्यानंतर जाधव अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मी देवाचे काम करतो आहे, लोकांसाठी काम करतोय. कुणाला घाबरत नाही, स्पष्ट बोलतो हे अनेकांना आवडललेलं नाही. (Kannad) म्हणून मला कुठे तरी अडकवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न राज्य सरकारने माझा जामीन रद्द करावा, या अर्जाच्या माध्यमातून केला.
पण कोर्टाने तो फेटाळून लावला. माझ्यावर आरोप आहेत, गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. जाधव हे राजकारणी आहेत, त्यांना विरोधक देखील आहेत हे देखील कोर्टाने स्पष्ट सांगितले. (Marathwada) तरी देखील मला अडकवण्यासाठी सरकार आणि माझे विरोधक काहीना काही निश्चित करतील. पण मी कुणालाही घाबरणार नाही, लोकांसाठी काम करतच राहणार.
सगळेच राजकारणी स्वार्थी झाले तर आज सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसतायेत, उद्या पोटात खुपसतील. मला अशा राजकारणात रस नाही, मी परोपरकाराचे काम करतो, लोकांसाठी काम करतो. मला संपत्ती कमावयची नाही, की पेट्रोलपंप टाकायचे नाहीत. त्यामुळे उद्या हर्षवर्धन जाधवचे काही बरे वाईट झाले, तरी परोपकार सोडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.