UPSC achiever Harshvardhan Tidke from Pangri village in Parli taluka celebrates securing All India Rank 355, receiving congratulations from MLA Dhananjay Munde. Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde: "परळीचे नाव उंचीवर ने"; युपीएससीत यशाचा झेंडा फडकवणाऱ्या हर्षवर्धन तिडकेला धनंजय मुंडेंच्या शुभेच्छा

Harshvardhan Tidke UPSC Rank 355 : परळी तालुक्यातील पांगरी गावच्या हर्षवर्धन तिडके यांनी यूपीएससी परीक्षेत 355 वा क्रमांक मिळवत यश मिळवले. आमदार धनंजय मुंडे यांनी अभिनंदन करत परळीचे नाव उंचावल्याचे म्हटले.

Jagdish Pansare

UPSC Result Beed News : गेल्या दीड वर्षापासून परळी तालुक्याचे नाव राज्यात आणि देशात गाजते आहे. पण ते महादेव मुंडे, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमुळे. परळीला बदनाम केले जात आहे, असा आरोप या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार धनंजय मुंडे, मंत्री पकंजा मुंडे यांनी केला आहे. एकीकडे हा बदनामीचा डाग तर दुसरीकडे उज्जवल यशाची परंपरा राखत मान उंचवायला लावणारे क्षणही परळीकरांच्या वाट्याला येत आहेत.

परळी वैद्यनाथ तालुक्यातील पांगरी येथील हर्षवर्धन अशोक तिडके या तरूणाने युपीएससी परीक्षेत यश मिळवत उत्तुंग भरारी घेतली आहे. हर्षवर्धन यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर 355 रँक मिळवत यशाला गवसणी घातली आहे. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी या यशाबद्दल हर्षवर्धन तिडके याचे तोंडभरून कौतुक व अभिनंदन केले आहे.

परळी वैद्यनाथ तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) येथील हर्षवर्धन अशोक तिडके याने संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर 355 रँक मिळवत सर्वोच्च नागरी सेवेत आपले स्थान निश्चित केले, हे अत्यंत अभिमानास्पद आणि संपूर्ण परळी तालुक्याची मान उंचावणारी बाब आहे. सलग दुसऱ्या वर्षी पांगरी गावाने देशाला एक अधिकारी दिला आहे.

हर्षवर्धन, तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत तू देशवासीयांची उत्कृष्ट सेवा करशील व स्वतःचे व परळीचे नाव आणखी उंचीवर घेऊन जाशील या अपेक्षेसह तुझ्या भविष्यातील वाटचालीस अनंत शुभेच्छा, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी हर्षवर्धन सहित राज्यातील सर्व युपीएससी रँकर्सचे अभिनंदन केले आहे. हर्षवर्धन तिडके यांचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथील न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये झाले त्यानंतर सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल मध्ये झाले आयआयटी बॉम्बे पवई येथे बीटेकचे शिक्षण घेतल्यानंतर हर्षवर्धनने यूपीएससीची तयारी सुरू केली.

त्यानंतर पहिल्या प्रयत्नात हर्षवर्धनच्या पदरी अपयश आले मात्र त्यांने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करत यशाचा झेंडा रोवला आहे. दररोज आठ ते दहा तास अभ्यास करत हर्षवर्धन ने यशाला अखेर गवसणी घातली. हर्षवर्धन याची आई गृहिणी असून वडील लातूर येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर झाला असून, देशभरातून 958 उमेदवारांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे या मध्ये महाराष्ट्रातील 60 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT