Parli news : मोठी बातमी: परळीतलं महत्त्वाचं कार्यालय हलवण्याच्या हालचाली सुरू; मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट?

Parli office shifting controversy : परळीतल्या महत्त्वाच्या कार्यालयाच्या स्थलांतराच्या चर्चेमुळे मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरण तापलं आहे.
Parbhani Gopinath Munde news
Parbhani Gopinath Munde newsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : दिवगंत लोकनेते गोपीनाथ मुंडे, त्यांच्या कन्या पकंजा मुंडे, पुतण्या धनंजय मुंडे यांची कर्मभूमि असलेली परळी नेहमीच चर्चात असते. कधी चांगल्या कारणांसाठी तर कधी वाईट गोष्टीमुळे. परळी तालुक्यातील छोट्याशा गावात जन्मलेले गोपीनाथ मुंडे हे देशाच्या राजकारणात पोहचले, मंत्री झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक विकास कामे परळी मतदारसंघ, बीड जिल्हा, मराठवाडा आणि राज्यासाठी केली.

आता त्याच गोपीनाथ मुंडे यांनी परळीमध्ये आणलेले पाटबंधारे विभागाचे सर्कल कार्यालय परभणीला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परळीचे राजकीय महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. परळी वैजनाथ येथे 30 वर्षापासून कार्यरत असलेले बीड पाटबंधारे प्रकल्पाचे सर्कल कार्यालय परभणी येथे स्थलांतरित करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

या सर्कल कार्यालयाअंतर्गत बीड, लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील पाटबंधारे प्रकल्पांचे काम पाहिले जाते. परळी हे तिन्ही जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रशासन, शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे कार्यालय परळीत असणे अत्यंत सोयीचे मानले जात होते. मात्र, असे असतानाही प्रशासकीय आस्थापना पुनर्रचनेच्या नावाखाली हे कार्यालय परळीतून हटवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वीच परळीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर आता पाटबंधारे सर्कल कार्यालयही परळीतून हलवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने परळीचे प्रशासकीय महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड यांनी केला आहे. परळी वैजनाथ येथे तीन परिमंडळ कार्यालय होते. त्यात ऊसतोड कामगार, महावितरण आणि पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाचा समावेश होतो.

यातील उसतोड कामगार कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे तर महावितरणचे कार्यालय लातूर येथे हलवण्यात आले आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा ओळखला जातो. मात्र आता ते कार्यालय आता छत्रपती संभाजीनगरला हलवल्याने त्यांना तिकडे जावे लागते. आता पाटबंधारे विभागाचे कार्यालय इथून हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाटबंधारे कार्यालय परळीतून हलवू नये, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com