Nanded Hospital Death : Sarkarnama
मराठवाडा

Nanded Hospital Death : शासकीय रुग्णालयात ३१ मृत्यू : हसन मुश्रीफ तातडीने नांदेड दौऱ्यावर

अनुराधा धावडे

Nanded Hospital News : नांदेडमधील विष्णुपुरीतील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ तातडीने नांदेडला रवाना होणार आहेत. आज दुपारी ते शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा करणार आहेत.

असा असेल मुश्रीफांचा दौरा

हसन मुश्रीफ आज दुपारी एक वाजता नांदेडकडे रवाना होतील. दुपारी तीन ते चार या वेळेत ते रुग्णालयाची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी चार वाजता ते पत्रकार परिषदही घेतील आणि पाच वाजता पुन्हा मुंबईकडे रवाना होतील.

याबाबत मुश्रीफ म्हणाले, रुग्णालयात जे मृत्यू झालेत, त्याची सखोल चौकशी करू आणि जे कोणी जबाबदार असतील, त्याच्यावर कारवाई केली जाईल. या ठिकाणी स्टाफ पुरेपूर होता. औषधांचा साठाही पुरेसा होता; पण गंभीर अवस्थेत रुग्णांचं दाखल होणं, खूप वेळाने अॅडमिट होणं, सर्पदंश झालेले रुग्ण दाखल होणं, अपघातग्रस्त रुग्ण दाखल होणं, अशा प्रकारचे रुग्ण दाखल झाले होते, त्यामुळे या घटना घडल्या.

पण विरोधक माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मी तर दोन महिन्यांपूर्वी आलेला माणूस आहे. मी पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याचीही काळजी घेईन, असे आश्वासनही मुश्रीफ यांनी या वेळी दिले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. नांदेड हा त्यांचा मतदारसंघ आहे, पण त्यांनी या रुग्णांच्या मृत्यूमागे राजकारण करता कामा नये. तिथे मृत्यू कसे झाले, त्या प्रत्येक मृत्यूची मी चौकशी करणार आहे आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT