Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray On Nanded Hospital : आरोग्य 'व्हेंटिलेटर'वर असेल, तर 'ट्रिपल इंजिन'चा उपयोग काय? राज ठाकरेंचा खडा सवाल

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar : सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा विमा उतरवला आहे.
Published on

Mumbai Political News : शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे सर्वसामान्यांचे आहे. हे 'ट्रिपल इंजिन' सरकार असून, विकासकामांचा वेग वाढला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यभर वेळोवेळी केला आहे. मात्र, कळवानंतर नांदेडमधील रुग्णालयात मृत्यूचे तांडव झाले. दोन दिवसांत तब्बल ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नांदेड घटनेवरून सरकारच्या कारभारावर बोट ठेवून वाभाडे काढले आहेत. (Latest Political News)

राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर असताना २०२४ मध्ये आपणच कसे सत्तेवर येऊ, यात सरकार व्यस्त आहे. सरकारचे संख्याबळ ठणठणीत असून, संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, "नांदेडमधल्या सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यातही अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय."

Raj Thackeray
Gulabrao Patil News : गुलाबराव पाटील सरकारला घरचा आहेर देण्याच्या तयारीत; छेडणार आंदोलन

राज्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करून ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर घणाघात केला. 'रुग्णांच्या मृत्यूच्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिन लागूनही राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती आहे, मग या ट्रिपल इंजिनचा उपयोग काय?, असा खडा सवाल उपस्थित करून राज यांनी सरकारला धारेवर धरले.

ठणठणीत सरकारने राज्याचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही ठाकरेंनी दिला आहे. 'सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवला आहे. त्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाही, पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असे की, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत असून, बाकी महाराष्ट्र आजारी आहे. सरकारने स्वतःचं आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आरोग्य कसे सुधारेल, याकडे अधिक लक्ष द्यावे,' असेही राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Raj Thackeray
Raju Shetti News : स्वाभिमानी उतरणार रस्त्यावर; साखर वाहतुकीस विरोध करणार, काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com