Parbhani Political News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Political News : दोघात तिसरा, सरपंच पद विसरा; पिंपळगावच्या ज्योती पवार अपात्र...

Gram panchayat News : सरपंच ज्योती रवी पवार यांना जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये अपात्र घोषित केले आहे.

Prasad Shivaji Joshi

Marathwada Politics : सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष नेहमीच संधीची वाट पाहत असतात. नियमावर बोट ठेवून खाली कुरघोडी करणे आणि स्वत: सत्ता प्राप्त करणे याचा अवलंब सर्वच राजकीय पक्ष करतात. (Gram Panchayat News) परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असेच घडले. पिंपळगाव (काजळे तांडा) येथील सरपंचाना तिसरे अपत्य झाल्याचे कळले आणि विरोधी सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

सुनावण्या झाल्या आणि अखेर तक्रारदार वच्छला चव्हाण यांचा अर्ज मान्य होऊन सरपंच ज्योती पवार यांना सरपंच पद गमवावे लागले. (Parbhani) ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अनेकदा ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यासाठी आवश्यक पात्रतेकडे दुर्लक्ष केले जाते. (Marathwada) याचाच फायदा विरोधक घेतात आणि निवडून आलेल्या सदस्यांना अपात्रतेचा सामना करावा लागतो.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी १२ सप्टेंबर २००० नंतर दोन अपत्य असण्याची अट आहे. (Maharashtra) तसेच निवडून आल्यानंतरसुद्धा एकूण अपत्य संख्येत दोनपेक्षा अधिक झाले असता, अपात्र घोषित केले जाते. या नियमाकडे कानाडोळा केल्यानंतर सदस्यपद, उपसरपंच आणि सरपंच पदसुद्धा जाऊ शकते, याची माहिती असूनसुद्धा अनेक सदस्य दुर्लक्ष करतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामपंचायत पिंपळगाव काजळे तांडा ता. जिंतूर जि. परभणी येथील सरपंच ज्योती रवी पवार यांना जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये अपात्र घोषित केले आहे. या प्रकरणी पिंपळगाव काजळे तांडाच्या ग्रामपंचायत सदस्य वच्छला नामदेव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी,परभणी यांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले होते की, सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२० मध्ये पिंपळगाव (काजळे) तांडा ता. जिंतूर जि. परभणी येथील वार्ड क्रमांक २ मध्ये ज्योती रवी पवार यांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. या वेळी दिलेल्या घोषणापत्रात त्यांनी १३ सप्टेबर २००० नंतर दोन अपत्ये असल्याचे घोषित केले होते.

प्रीती रवी पवार व तेजस्वीनी रवी पवार अशी त्यांची नावे आहेत. मात्र, १ मार्च २०२३ रोजी ज्योती पवार यांची परभणी येथील खासगी दवाखान्यात प्रसूती होऊन त्यांनी पुरुष जातीच्या जुळ्या अपत्यांना जन्म दिला. यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्यात यावे, अशी तक्रार करण्यात आली. अर्जदार वच्छला नामदेव चव्हाण यांनी यासंदर्भात ज्योती रवी पवार यांच्या दोन्ही मुलींचे मूळ प्रवेश निर्गमची छायांकित प्रत दाखल केली. तसेच परभणी शहर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील मूळ अभिलेख पडताळणीनंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वच्छला नामदेव चव्हाण यांचा अर्ज मान्य करून बुधवार दि. १८ रोजी ज्योती रवी पवार यांना अपात्र घोषित केल्याचे आदेश निर्गमित केले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT