Nanded Political News : शिंदेंच्या बंडात सहभागाचे धाडस करणाऱ्या बालाजींचे `कल्याण` होणार का ?

Shivsena News : नांदेड जिल्ह्यात एकमेव असलेले आमदार बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले.
Nanded Political News
Nanded Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : नांदेड जिल्ह्यातील शिंदे गटाचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. नांदेड उत्तर मतदारसंघातून बालाजी कल्याणकर हे शिवसेनेकडून निवडून आले होते. (Nanded News) महाविकास आघाडीचा प्रयोग, अडीच वर्षाच्या सत्तेनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेले बंड या सगळ्या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय गणित बदलले आहे.

Nanded Political News
Maharashtra Loksabha Constituency : शिंदे गटाच्या तेरा खासदारांना मिळणार उमेदवारी, इतर मतदारसंघांत काय ?

नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिंदेंच्या बंडात उडी घेतली आणि ते चर्चेत आले. (Eknath Shinde) शिंदेंसोबत गेलेले सगळे आमदार जेव्हा सुरतच्या हाॅटेलमध्ये होते, तेव्हा आपला चेहरा दिसू नये यासाठी बालाजी कल्याणकर प्रयत्न करत होते. आता २०२४ विधानसभा निवडणुकीत मतदारांसमोर ते आपला चेहरा घेऊन जाणार आहेत. (Shivsena) ठाकरे गटाला असलेली सहानुभूती आणि त्यामुळे असणारे आव्हान बालाजी पेलणार का? आणि त्यांचे `कल्याण` होणार का? याची चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे.

विधानसभा निवडणुकीला एक वर्ष अवधी असला तरी राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने अधुनमधून मध्यावधी निवडणुकीची चर्चाही होत आहे. (Marathwada) तसे झालेच तर आपला पक्ष निवडणुकीसाठी तयार राहावा यासाठी प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे. शिवसेनेत गेल्या वर्षी उभी फुट पडल्यानंतर नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील दोन आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. नांदेड जिल्ह्यात एकमेव असलेले आमदार बालाजी कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर हिंगोली जिल्ह्यांतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनीही शेवटच्या क्षणी शिंदे गटात उडी मारली होती. या शिंदे गटाच्या दोन्ही ‌‌‌‌‌‌आमदारांना आपले मतदारसंघ कायम ठेवण्याचे आव्हान येणाऱ्या निवडणुकीत पेलावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा सामना ते कसा करणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. नांदेड शहरात दक्षिण व उत्तर असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत.

गेल्या निवडणूकीत नांदेड दक्षिण मधून काॅंग्रेसचे मोहन हंबर्डे तर उत्तरमधून शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे निवडून आले. उत्तर मतदारसंघात गेल्या वेळेस चौरंगी लढत झाली. याचा फायदा आमदार बालाजी कल्याणकर यांना झाला आणि त्यांनी काँग्रेसच्या माजी मंत्री डी. पी. सावंत यांचा पराभव केला. कल्याणकर यांच्या अनपेक्षित विजयाने काॅंग्रेसला विशेषतः अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसला होता. बालाजी कल्याणकर हे तीन वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यामुळे शहरी भागातील या मतदारसंघाच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे.

Nanded Political News
Devendra Fadnavis News : ललित पाटीलच्या अटकेनंतर फडणवीसांचा खळबळजनक दावा; "...त्यामुळे अनेकांची तोंडं बंद होणार!"

पक्ष सोडून गेल्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट मोठी ताकद त्यांच्या मतदारसंघात लावणार आहे. शिवाय महाविकास आघाडी असल्याने त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीचेही बळ मिळणार आहे. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे त्याला तो मतदारसंघ‌ सोडण्याचे सुत्र असल्याचे बोलले जाते. त्यानूसार शिवसेना ठाकरे गट नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर दावा करु शकतो.

पक्ष सोडून गेले खासदार, आमदार अपवाद वगळता पुन्हा निवडून आलेले नाहीत हा जिल्ह्याचा इतिहास आहे. तो पाहता आमदार बालाजी कल्याणकर यांना खूप जोर लावावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देऊन कल्याणकर यांना बळ देण्यात येत आहे. असे असले तरी कल्याणकर यांचा टिकाव ठाकरें गटाच्या सहानुभूतीपुढे लागतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com