Pankaja Munde, Santosh Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : "तो माझ्यासोबत काम करत होता..." संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडेंवर आरोप केले जात असतानाच भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांची बहीण पंकजा मुंडे यांनी देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Jagdish Patil

Pankaja Munde on Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवाय या हत्या प्रकरणी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप केले जात असतानाच भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांची बहीण पंकजा मुंडे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी राज्यात सर्वात आधी एसआयटी लावण्याची मागणी मीच केली होती, असं पंकजा यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, "सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये SIT नेमण्याची मागणी पहिल्यांदा मीच गोपीनाथ गडावरून केली होती. तसंच या घटनेचा तीव्र संताप देखील त्यावेळी मी व्यक्त केला होता.

सध्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. ते संतोष देशमुखांना आणि त्यांच्या घरच्यांना नक्की न्याय देतील.", असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तसंच संतोष देशमुख हा माझाच बुथप्रमुख होता तो सरपंच असताना माझ्यासोबत काम करत होता, असंही मुंडेंनी यावेळी सांगितलं.

...म्हणून संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंना टार्गेट केलं जातंय

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वाल्मिक कराड जबाबदार असून त्याला अटक का केली जात नाही? असा प्रश्न विरोधकांसह देशमुखांच्या कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा कट्टर समर्थक असल्यामुळेच त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोपही विरोधक करत आहेत.

कारण मुंडे आणि कराड यांचे खूप जवळचे संबंध असून संपूर्ण बीड जिल्ह्याला ते माहिती आहेत. त्यामुळेच आता या हत्या प्रकरणावरून विरोधक मुंडेंना टार्गेट करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT