Nagpur News : महायुतीची सत्ता असताना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘अकेला देवेंद्र क्या करेगा‘ असा सवाल केला होता. त्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणातून सडेतोड उत्तर दिले. भाजप आणि महायुतीच्या आमदारांचा आकडा बघून त्यांना मी काय करू शकतो हे आता त्यांना कळले असेल असाही टोला त्यांनी यावेळी लागवला. अर्थाय हे यश भाजप आणि महायुतीचे असल्याचेही त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली.
महाविकास आघाडीचे सरकार उलथवल्यानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा ४० आमदार घेऊन महायुती सहभागी झाले होते. त्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे नेते चांगलेच चिडले होते. निवडणूक आयोगानेसुद्धा अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह सोपवले होते.
त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला होता. तेव्हापासून फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टोलेबाजी सुरू केली होती. यातच सुप्रिया सुळे यांनी अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा असे वक्तव्य करून महायुतीचे भवितव्य धोक्यात असल्याचे संकेत दिले होते.
मात्र आता फडणवीस यांनी त्यांच्यावरच डाव उलटवला. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 10 आमदार शिल्लक ठेवले. याउलट भाजपचे 132 आणि महायुतीचे 237 आमदार निवडून आले आहेत. राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. महायुतीने राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले आहे.
ज्यांच्या पाठिशी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उभे राहिले तर काय होते हे जनतेनी दाखवून दिले. हे सर्व यश भाजपचे कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांचे आहे. आजवर एवढे अभूतपूर्वी यश यापूर्वी महाराष्ट्रात कधीच मिळाले नव्हते. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी यांच्या ‘हार नही मानूंगा, गीत नया गाऊंगा‘ तसेच ‘अंधेरा हटेगा, कमल खिलेगा...‘ या त्यांच्या कविता उद्युक्त केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.