Abhijeet Dipke Sarkarnama
मराठवाडा

Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंविरोधातील आंदोलनाला गंभीर वळण : उपोषणकर्त्यंची प्रकृती खालावली, पोलिसांची धावपळ

Abhijeet Dipke: दिपके यांच्या बाबतीत आठवडाभरात दोन मोठे वाद झाल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळं दिपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Jagdish Pansare

Abhijeet Dipke: सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पदाधिकारांच्या बैठकीत बोलावले नाही, म्हणून गुजरातमधून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिपके यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. परंतू पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या आंदोलकांनी गेल्या चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. आज पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय घाटीमध्ये दाखल केले. चार दिवसापासून उपोषण सुरू असल्यामुळे या आंदोलकांची प्रकृती बिघडली होती. आज पोलिसांनी उपोषणस्थळी दाखल होत या आंदोलकांना अॅम्ब्यूलन्समधून घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले.

दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजीत दिपके गेल्या आठवडाभरापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. दरम्यान, त्यांनी सीजेपी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, प्रवक्त्यांची दोन दिवसीय बैठक आपल्या बजाजनगर येथील निवासस्थानी घेतली होती. पहिल्या दिवशी बैठक सुरळीत पार पडली होती, पण दुसऱ्या दिवशी गुजरातमधील दोन कार्यकर्ते राहुल पांड्या आणि मनीष ब्रम्हभट्ट यांनी अभिजीत दिपके यांच्या घरासमोरच गोंधळ घालत आम्हाला बैठकीला का बोलावले नाही? फक्त प्रवक्त्यांना बोलावले असे आम्हाला सांगितले गेले. मग अभिजीतचे नातेवाईक, कॉलेजमधील मित्र, मैत्रीणी बैठकीला कशा? असा सवाल या आंदोलकांनी केला होता.

एवढेच नाही तर घरासमोरच त्यांनी उपोषण सुरू केले होते. अखेर पोलीसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर या दोघांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता. त्यांची प्रकृती खालवल्यामुळे पोलीसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आणि रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, अभिजीत दिपके यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींना रोखल्याबद्दल वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यांच्यावरही दिपके यांनी संताप व्यक्त केला होता. मी कोणाला भेटायचे हे तुम्ही नाही ठरवणार, मीच ठरवणार, तुम्ही माझ्या घरातून निघून जा, असे म्हणत या अधिकाऱ्याला घराबाहेर काढले होते. यानंतर पोलीस बॉईज संघटनेनेही अभिजीत दिपके यांच्या विरोधात जिल्हाधिकारी, तसेच पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दिली होती. दिपके यांनी माफी मागावी आणि त्यांची पोलीस सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. दिपके यांच्या बाबतीत आठवडाभरात हे दोन मोठे वाद झाल्याचे पहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT