Mumbai High Court Latest Marathi News Sarkarnama
मराठवाडा

High Court News: हरकती न मागवता औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय कसा घेतला ?

Marathwada : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा बनला आहे.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News : औरंगाबाद व उस्मानाबाद(Osmanabad) शहरांचे नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव करण्याच्या प्रकरणावर मंगळवारी (Bombay High Court) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्या. मारणे यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने तीन प्रश्न उपस्थित करून पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

या संदर्भात ॲड. प्रज्ञा सतीश तळेकर यांनी माहिती दिली. (Aurangabad) नामांतरप्रश्नी हरकती न मागवता निर्णय कसा घेतला? कार्यालयीन कार्यवाही झालेली नसताना सचिवपदावरील अधिकारी बदलेले नाव कसे वापरतात? (Osmanabad) केंद्र सरकारला त्यांची स्थिती काय, असे तीन प्रश्न उच्च न्यायालयाने विचारले आहेत.

उस्मानाबाद नामांतराविरोधात मोहम्मद मुश्ताक अहमद चाऊस, मसूद शेख, औरंगाबादचे खलील सय्यद यांच्यासह इतर १९ याचिका दाखल आहेत. याप्रकरणी अ‍ॅड. प्रज्ञा सतीश तळेकर यांनी तर औरंगाबाद नामांतर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. युसूफ मुचाला यांनी बाजू मांडली.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा बनला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवरून पायउतार होताहोता औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा ठराव विधानसभेत मंजुर करून घेतला होता.

दरम्यान, नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबादच्या नावात सुधारणा करत छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT