Budget 2023 Live Updates : शेतीसंबंधित स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची मोठी योजना

Union Budget 2023 Live News: शेतीशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाईल.
Budget 2023 | Nirmal Sitaraman
Budget 2023 | Nirmal SitaramanSarkarnama
Published on
Updated on

Union Budget 2023: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू झाले. आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

तरुणांना शेतीशी जोडण्यासाठी मोठी घोषणा

शेतीशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाईल. तरुण उद्योजकांना कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंडाची स्थापना केली जाणार आहे. यासोबतच सीतारामन यांनी भरडधान्यांचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या भारतातील बाजरी म्हणजेच भरडधान्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा पुरवठा करण्यासाठी बाजरी संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

Budget 2023 | Nirmal Sitaraman
Budget 2023 Live : इन्कम टॅक्सची स्लॅब ७ लाखांवर

यावेळी भारतातील तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी आणि त्यांना शेतीशी जोडण्यासाठी भारत सरकारने नवीन फंड स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तरुण उद्योजकांद्वारे कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी प्रवेगक निधीची स्थापना केली जाईल. कृषी क्षेत्रातील मानव संसाधनांना प्रशिक्षण देण्याचे कामही सरकार करेल.

यासोबतच षी क्षेत्रांतर्गत कृषी कर्जाचे उद्दिष्ट वाढवण्याची घोषणा केली आहे. दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपये करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्चला उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून समर्थन दिले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कोणतेही पीक घेण्याकरता शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, कषीपुरक स्टार्टअपसाठी मदत करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार आहे. पीएम मत्स्य संपदा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ६ हजार कोटी निधीची तरदूत, मासेमाऱ्यांना मदत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे, .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com