Marathwada : सेलू (जि. परभणी) येथील रेल्व स्टेशनलगत असलेल्या सर्वे नंबर १६० व २१५ ची जमीन सरकारी आहे. या जमिनीवर अतिक्रमणे काढून टाकण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजाणी झाली नाही. (High Court News) म्हणून या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली असून, न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाची सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे. (Aurangabad) दिलीप डासाळकर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, सर्वे नंबर १६० व २१५ या सेलू येथील शासकीय जमिनीवर जवळपास २७ दुकानाचे व्यापारी संकुल, पेट्रोल पंप, एक हॉटेल, मंगल कार्यालय यासह फ्रेंड्स क्लबची इमारत (High Court) असा एकूण ३० गुंठे अर्थात अर्धा एकर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे.
सदरचे अतिक्रमण काढून जमीन ताब्यात घ्यावी, असे आदेश परभणीचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी २०१७ मध्ये दिले होते. (Parbhani) मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. जवळपास सात वर्ष पूर्ण झाले, तरीही या संदर्भात महसूल खात्याकडून कुठलीच कारवाई झालेली नाही.
दरम्यान खंडपीठाने याचिका जनहित याचिका म्हणून स्वीकारली असून, महसूल विभागाचे सचिव, परभणीचे जिल्हाधिकारी, सेलू न. प. चे मुख्याधिकारी तसेच फ्रेंड्स क्लब आदींना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे ॲड. गिरीश कुलकर्णी काम पाहत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.