Purna Sugar Factory: पूर्णा कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

High Court News: निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याच्या अध्यादेशाला आव्हान देण्यात आले होते.
Aurangabad High Court, News
Aurangabad High Court, NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada : वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार घ्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांनी बुधवारी (ता. पाच) दिले. कारखान्याची निवडणूक ९ जुलैला नियोजित आहे.

Aurangabad High Court, News
Marathwada NCP MLAs: मराठवाड्यातील आठ आमदार अजितदादांकडे, तर दोघे शरद पवारांसोबत..

याप्रकरणी निवडणुकीतील उमेदवार शहाजीराव साहेबराव देसाई, गजानन नामदेव धवन, श्रीधर दगडू पारवे व पूर्णा सहकारी कारखान्याकडून (Aurangabad) याचिका ॲड. सी. ए. देशमुख व ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होन यांच्यामार्फत दाखल करण्यात आल्या होत्या. (High Court) याचिकेतून राज्याचा निवडणूक आयोग, हिंगोली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

याचिकेतून राज्याच्या सहकार विभागाने २८ जूनला संबंधित विभागांतर्गत येणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याच्या अध्यादेशाला आव्हान देण्यात आले होते. (Marathwada) या अध्यादेशामध्ये पावसाचे कारण देण्यात आले आहे.

मात्र, मतपत्रिका, उमेदवारी अर्ज दाखल व मागे घेणे, अशा सर्वच प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून हिंगोली जिल्ह्यात पाऊसमानही कमी असल्याचा मुद्दा खंडपीठापुढे मांडण्यात आला. निवडणूक आयोगाकडून ॲड. एस. के. कदम यांनी मतमोजणी पुढे ढकलण्याची विनंती केली.

तर याच संदर्भाने ज्येष्ठ विधिज्ञ आर. एम. धोर्डे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला. मात्र, खंडपीठाने हस्तक्षेप अर्ज व निवडणूक विभागाची विनंती अमान्य करत पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठीचे मतदान नियोजित ९ जुलैला व ठरल्याप्रमाणे मतमोजणी घेण्याचे आदेश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.