Dharashiv News : धाराशिव, बीड, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात यावर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावली तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने पुराचा फटका बसला. गेल्या रविवारी (28 सप्टेंबरला) अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सीना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे सीना नदी काठच्या गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढली होती. त्याबाबत कार्यकारी अभियंता थोरात यांच्याशी रात्रभर संपर्क साधून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संपूर्ण परिस्थिती हाताळली.
अधिकारी थोरात यांनी हे धरण भरण्यासाठी तीन फूट अंतरापर्यत पाणी कमी ठेवले होते. मात्र, 28 सप्टेंबरला रात्रीच्या 12 तासातच सीना-कोळेगाव धरणात बसेल एवढा पाणी धरणातून सोडण्यात आला असल्याचा दावा ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला.
धाराशिव जिल्ह्यातील सीना-कोळेगाव धरणाची क्षमता पाच टीएमसी इतकी आहे. जिल्हयात सीना-कोळेगाव, तेरणा, धनेगाव धरण आहेत. यावर्षीच्या पावसाने हे तीनही धरण ओसंडून वाहत आहेत. सीना-कोळेगाव धरणा हे धाराशिव जिल्हयांतील सर्वात मोठे धरण आहे. त्याची क्षमता पाच टीएमसी इतकी आहे. हे धरण पावसाळ्यात म्हणजे गेल्या दोन महिन्याच्या काळात सहा वेळा भरल्यानंतर त्यामधून पाणी सोडण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव धरणातून रविवारी रात्री रात्रभर 1 लाख क्यूसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. धाराशिव जिल्ह्यात जरी पावसाने उघडीप दिली असली, तरी अहमदनगर, बीड आणि करमाळा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती.
यावेळी संपूर्ण रात्रभर पूर्ण 22 गेटमधून विसर्ग सुरु होता. मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात होते, वरून येणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रवाह जादा असल्याने संतुलन राहण्यासाठी जवळपास एक लाख क्यूसेकने (Cusecs) इतक्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे सीना नदी काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील काही गावाना बसला तर धाराशिव जिल्ह्यातील काही गावांना नुकसान सहन करावे लागले. यापूर्वी 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान सीना नदीला पूर आल्याने काही गावे आधीपासूनच रिकामे करण्यात आली होती. त्यामुळे याची झळ नदीकाठच्या गावांना बसली नाही.
रात्रभरात सीना कोळेगाव प्रकल्पातून 6 टीएमसी पाण्याचा विसर्ग
धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पाची पाणी क्षमता पाच टीएमसी असताना रविवारी रात्रभरात सहा टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सीना कोळेगाव प्रकल्पात 90 टक्के पाणीसाठा आहे, तर दहा टक्के बफर झोनमध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील नद्यांचे पाणी या प्रकल्पात दाखल होणार असल्याने त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात होती.
गेल्या काही वर्षात दुष्काळ असल्यामुळे सीना-कोळेगाव हे धरण कोरडेठाक देखील पडले होते. मात्र, आता मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. धाराशिव जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी सीना नदीच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.