Pradnya Satav
Pradnya Satav  Sarkarnama
मराठवाडा

Pradnya Satav News: महिला आमदाराच्या गालात चापट मारणारा पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामा ब्युरो

Pradnya Satav : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर काल (बुधवारी) हल्ला झाला आहे,

प्रज्ञा सातव यांनी स्वत:ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. फेसबुकवर त्यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोपही केला आहे. याप्रकरणी एकाला बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे आमदार डॉ. सातव तसेच गावकरीही गोंधळून गेले. डॉ. सातव तातडीने वाहनात बसून थेट कळमनुरीत दाखल झाल्या. त्यानंतर रात्री कळमनुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गावात जाऊन महेंद्र डोंगरदिवे यास ताब्यात घेतले.

आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी (८ फेब्रुवारी) रात्री ८.३० वाजता कसबे धावंडा गावात एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केला. त्याने सातव भाषण करीत असतानात्यांना मागे ओढून त्यांच्या गालात चापट मारली. डॉ. सातव यांनी स्वतः सोशल मीडियावर या हल्ल्याची माहिती दिली.

डॉ. प्रज्ञा सातव बुधवारी रात्रीच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे गेल्या होत्या. त्या गावकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना एक व्यक्ती पाठीमागून आली अन् अचानक सातव यांना बाजूला ओढून त्यांच्या गालावर चापट मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT