Eknath Shinde's Banner In Times Square : मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका अमेरिकेतही ; टाईम्स स्क्वेअरमध्ये झळकले बॅनर

CM Eknath Shinde Birthday Celebration In New York: अमेरिकेतील तरुणाईला शिंदे यांची भुरळ पडल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
Eknath Shinde Birthday Banner
Eknath Shinde Birthday Bannersarkarnama

Eknath Shinde Birthday News : राज्यात सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून सत्तातर झाले. या सत्तातराची चर्चा देशात नव्हे तर जगभर झाली. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केलं होतं, त्यानंतर या बंडाची ३३ देशांनी दखल घेतल्याचा दावा सातत्यानं शिंदे गटाकडून करण्यात येतो. याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेच्या न्यूर्यार्कमधील टाईम्स क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रलमध्ये बॅनर लागले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेतील तरुणाईला शिंदे यांची भुरळ पडल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. आज शिंदेंचा वाढदिवस. कामानिमित्ताने न्यूयॅार्कमध्ये असलेल्या काही भारतीय तरुणांनी शिंदेचा वाढदिवसानिमित्ताने टाईम्स स्केअरमध्ये केक कापून आनंदोत्सव साजरा केला.

Eknath Shinde Birthday Banner
Nana Patole :'पटोलेंसोबत काम करणं अशक्य' थोरातांच्या विधानावर पटोलेंनी दिलं 'हे' उत्तर.

टाईम्स स्केअरमध्ये साजरा झालेल्या शिंदेच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे आणि यांच्या काही मित्रांनी हा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनव जैन, राजीव पंड्या, रुचिता जैन आदींनी हा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. हे सर्व युवक कामानिमित्त न्यूयॉर्क येथे आहेत.

Eknath Shinde Birthday Banner
BJP News : निमंत्रण पत्रिकेतून काकडेंचे नाव,फोटो गायब ? ; निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील धुसफूस आली समोर

आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे शिंदेंची राज्यात नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी, अमराठी माणसांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण असल्याचे राजकीय विश्लेषक म्हणतात. मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका सातासमुद्रापार विस्तारला असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.राज्यात विविध ठिकाण आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com