Residents gather outside their homes after multiple earthquake tremors struck Hingoli, Nanded and Parbhani districts.  Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Earthquake : भूकंपाने महाराष्ट्र हादरला! 'या' जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री सलग चार धक्के; नागरिकांमध्ये घबराट

Hingoli earthquake Update : रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.६ इतकी नोंदवण्यात आली. त्यानंतर रात्री १.३७ वाजता पुन्हा धक्का जाणवला. पुढे पहाटे २.१७ आणि २.१८ वाजता आणखी दोन सौम्य धक्क्यांची नोंद झाली. उर्वरित धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे ३.६, ४.४ आणि ३.९ इतकी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Jagdish Patil

Hingoli Earthquake News, 09 Jul : हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि परभणी जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सलग चार धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री सुमारे १.३५ ते पहाटे २.१८ या कालावधीत एकामागोमाग चार धक्के बसल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

या धक्कांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे-शिरली परिसरात होता. पहिला आणि सर्वाधिक तीव्र धक्का रात्री १.३५ वाजण्याच्या सुमारास बसला.

रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.६ इतकी नोंदवण्यात आली. त्यानंतर रात्री १.३७ वाजता पुन्हा धक्का जाणवला. पुढे पहाटे २.१७ आणि २.१८ वाजता आणखी दोन सौम्य धक्क्यांची नोंद झाली. उर्वरित धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे ३.६, ४.४ आणि ३.९ इतकी असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नांदेड शहरासह तरोडा नाका, मालेगाव रोड आणि इतर भागांत भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. अचानक घरांना कंप जाणवल्याने नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. काही काळ शहरात भीतीचे वातावरण होते. परभणी जिल्ह्यातील अनेक भागांतही भूकंपाचे हादरे जाणवले.

हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात काही घरांना तडे गेल्याची, तर काही कच्च्या घरांचे किरकोळ नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी संपूर्ण रात्र घराबाहेरच काढली.

दरम्यान, उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, आधीच मुसळधार पावसामुळे बेजार झालेल्या महाराष्ट्रात काल रात्री झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT