Police Assault Case : कर्मचाऱ्याने कानशिलात लगावल्याने दुकानदाराला बहिरेपण; नागपूरमध्ये संतापजनक प्रकार

Nagpur Police Constable Assault Case : राज्यातील पोलिसांची सध्या कायदा व सुव्यवस्था न ठेवता दादागिरी आणि भाईगिरी करण्यात धन्यता मानत असणार्‍या घटना समोर येताना दिसत आहेत.
Nagpur Police
Nagpur Policesarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याला (एपीआय) एका पोलीस हवालदाराने जबर मारहाण केली होती. या प्रकरणी हवालदार विवेक रमेश बसनगार यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. बसनगार यांनी कर्तव्यावर असताना वरिष्ठ अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जातीवाचक, अश्लील आणि अरेरावीची भाषा वापरली होती. या घटनेची पोलीस वर्तुळात चर्चा सुरू असतानाच नागपूर पोलीस दलात देखील एका पोलीस कर्मचाऱ्याची दादागिरी चर्चेत आली आहे. या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या कानावर जोरात मारल्याने त्याला बहिरेपणा आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी भोसले असे या मग्रूर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मनीष गिरी हे दुकानदार असून त्यांचे हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी परिसरात 'पायल जनरल स्टोअर अँड कॅफे' हे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या बाजूलाच पोलीस कर्मचारी भोसले यांनी बिअर शॉपी सुरू केली आणि आपल्या बिअर शॉपीचा बोर्ड थेट मनीष गिरी यांच्या पायल जनरल स्टोअरसमोर लावला.

यामुळे जनरल स्टोअरमध्ये नियमित येणाऱ्या महिला आणि विद्यार्थ्यांचे येण्याचे प्रमाण कमी झाले. तसेच पुढेही असाच प्रकार होत राहील, या भीतीने मनीष गिरी यांनी पोलीस कर्मचारी भोसले यांना, "तुमच्या बिअर शॉपीचा बोर्ड तुमच्या दुकानासमोर लावा," अशी विनंती केली.

Nagpur Police
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी PSI ला अटक, पोलीस विभागात एकच खळबळ; अटकेनंतर थेट...

यावर संतापलेल्या पोलीस कर्मचारी भोसले यांनी गिरी यांच्या थेट कानशिलात मारल्याचा आरोप आहे. दरम्यान, गिरी यांच्या ऐकण्याची क्षमता कमी झाल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर त्यांची ऐकण्याची शक्ती कमी झाली असून त्यांना बहिरेपणा आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.

यानंतर पोलीस कर्मचारी भोसले यांच्या हल्ल्यामुळे आपल्याला कायमचा बहिरेपणा आल्याने शारीरिक नुकसान झाल्याची तक्रार गिरी यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी पोलीस कर्मचारी भोसले यांच्याविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

Nagpur Police
Crime News : अधिवेशनला गेलेल्या आमदारांच्या घरात चोरी, रोख रक्कम आणि स्वाक्षरीचा धनादेशावर हात साफ; मात्र एका चुकीने चोर फसला

दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असून अद्याप पोलीस कर्मचारी भोसले यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात असून, पोलीस आपल्या कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com