Hingoli District Anti Corruption Bureau Raid
Hingoli District Anti Corruption Bureau Raid Sarkarnama
मराठवाडा

Hingoli : गटविकास अधिकाऱ्याला कार्यालयातच पाच हजारांची लाच घेतांना अटक

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : औंढा पंचायत समितीमध्ये लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांना तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडून अटक केली. (Hingoli) सध्या शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून गुरांचा गोठा व सिंचन विहिरी मंजूर करून अनुदान वाटप सुरू आहे. (anti corruption bureau)

योजनेचा लाभ देण्यासाठी गटविकास अधिकारी खिल्लारी यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. (Marathwada) त्याशिवाय शासकीय योजनेतील जनावरांच्या गोठ्याचे व विहिरीचे कार्यारंभ आदेश देणार नसल्याचे संबंधितास गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

त्यामुळे याबाबतची तक्रार हिंगोलीच्या लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत गटविकास अधिकारी हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने आज त्यांच्या कार्यालयातच सापळा रचून त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याने हिंगोली जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली. आज दुपारी गटविकास अधिकारी खिल्लारी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारत असतांना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT