MLA Santosh Bangar Sarkarnama
मराठवाडा

Santosh Bangar : वादग्रस्त वक्तव्य करणारे शिंदे गटातील आमदार पुन्हा चर्चेत; काय आहे कारण?

Mangesh Mahale

Hingoli News : राज्याच्या सत्तासंघर्षात सर्व आमदार सुरत आणि गुवाहाटीला जात असताना तेव्हा आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना भरकार्यक्रमात रडत होते, त्यानंतर हळूच आतल्या दाराने शिंदे गटात सहभागी झाल्याने संतोष बांगर चांगलेच चर्चेत आले आणि आता एका वेगळ्याच कारणाने ते चर्चेत आले आहेत.

शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार संतोष बांगर नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतात, हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी, संतोष बांगर यांनी महापुरुषांचे पुतळे मतदारसंघात बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षभरापासून हे पुतळेनिर्मिती सुरू होती. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. नागपूरमध्ये हे पुतळे तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये छत्रपती शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहल्याबाई होळकर, गौतम बुद्ध, भगवान बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. यातील काही पुतळे मतदारसंघात आणले आहेत. महापुरुषांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावेत. येणाऱ्या पिढीने महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, यासाठी आपण हा उपक्रम राबवित असल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले आहे.

बांगर यांनी यापूर्वी अशीच काही वादग्रस्त विधानं केली आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर गावात गेल्या 18 वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. भौतिक सुविधांचा अभाव असल्याने महाविकास आघाडी सरकारकाळात या आश्रमशाळेच्या इमारतीसाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

निविदा प्रक्रियासुद्धा पूर्ण झाली. पुढील कार्यवाही सुरू असतानाच आघाडी सरकार कोसळले आणि मंजूर कामे रद्द करण्याचा धडाका सुरू झाला. त्यात मागे राहतील ते आमदार बांगर कसले. त्यांनीसुद्धा शिरडशहापूर येथील मंजूर आदिवासी शाळेचा निधी रद्द करावा आणि तो निधी कळमनुरी मतदारसंघात विकासकामासाठी द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यावरून आज आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी नागरिक चांगलेच आक्रमक झाले. वसमत तहसील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढत विरोध केला होता.

Edited by : Mangesh Mahale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT