Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha 2024 : एकाच्या घरी नाश्ता तर दुसऱ्याच्या घरी जेवण; हिंगोली दौऱ्यात ठाकरेंनी साधला समतोल...

Jagdish Pansare

Hingoli Political News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील पदाधिकारी आणि इच्छुकांना सांभाळणे सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी कसरत ठरत असते. अशावेळी संयमाने परिस्थिती हाताळून त्यांना खूष ठेवणे महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे (Shivsena UBT) यांना अशी कसरत करावी लागली.

राज्यातील महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांत सर्व 48 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर होणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश आष्टीकर तसेच माजी खासदार सुभाष वानखेडे हे दोघेही इच्छुक आहेत. पक्षाने नागेश आष्टीकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा असली तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. (Hingoli Loksabha 2024)

अशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सरबराई करण्यात या दोन्हीही नेत्यांनी कुठलीच कसर ठेवली नाही. परंतु पक्षप्रमुख हे त्याहीपेक्षा दोन पावले पुढे असल्याचे दिसून आले. हदगाव येथील जनसंवाद सभा, पदाधिकारी मेळाव्याला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांच्या घरी हुरड्याचा आस्वाद घेतला. गव्हाच्या ओंब्याचा नाश्ता करत ते पुढच्या प्रवासाला निघाले.

ठाकरेंनी वानखेडे यांच्या घरी नाष्टा केल्यामुळे त्यांना झुकते माप दिले की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. तोच हादगाववरून परत येताना उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार नागेश आष्टीकर यांच्या घरी दुपारचे जेवण घेत विश्रांती घेतली. त्यामुळे दोघांचेही समर्थक खूष झाले आणि ठाकरे यांच्या या समतोल साधण्याची चर्चा दिवसभर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून Loksabha Election पराभूत झालेले सुभाष वानखेडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्वगृही परतले होते. लोकसभा निवडणुकीत Hingoli Loksabha Constituency हिंगोली मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यालाच संधी द्यावी, असा एक मतप्रवाह असल्याने माजी आमदार नागेश आष्टीकर (Nagesh Ashtikar) यांचे नाव समोर आले.

शिवसेनेकडून तीन महिन्यांपूर्वी पाठवण्यात आलेल्या निरीक्षकांनी नागेश आष्टीकर यांच्याच बाजूने कौल दिल्याचेही बोलले जाते. तेव्हा ठाकरे गटासोबत असलेले रवींद्र वायकर हे नांदेड आणि हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते.

त्यावेळी नागेश आष्टीकर यांच्या शेतात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तेव्हा हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या विजयाचा पेढा आष्टीकरांच्या शेतातच पुन्हा खायला येऊ, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या उमेदवारीचे संकेत वायकर यांनी दिले होते.

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात वानखेडे आणि आष्टीकर हे सोबत होते. ठाकरेंनी या दोघांनाही सारखेच महत्तव देत उमेदवारी कोणाला मिळणार याचा अंदाज अद्याप येऊ दिलेला नाही.

शिवाय याच हिंगोली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी महागाव संस्थांनचे मारुती गुरू महाराज यांच्याशी बंद खोलीत 20 मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी आष्टीकर या दोघांनाही बाहेर थांबण्यास सांगितले होते.

Edited By : Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT