Jyoti Mete News: पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढणार; शरद पवारांच्या भेटीनंतर मेटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

Loksabha Election 2024 : बजरंग सोनवणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांची पुन्हा अजित पवारांसोबत बैठक झाल्याने त्यांची व शरद पवार गटांमधील बोलणी लांबली.
Jyoti Mete - Sharad Pawar- Pankaja Munde
Jyoti Mete - Sharad Pawar- Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख जेष्ठ नेते शरद पवार व शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे यांची मंगळवारी पुण्यात भेट झाली. या भेटीत बीडमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी डॉ. ज्योती मेटे यांना देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. बुधवारी पुन्हा पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडच्या निवडणुकीबाबत रणनीतीची बैठक होणार आहे.

बीड लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी गृहीत धरून तयारी करणाऱ्या खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळून भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीत बीडची जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही बीडसाठी तगड्या उमेदवाराचा शोध सुरू केला. पक्षाकडून माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. सुशीला मोराळे, इश्वर मुंडे आदी तयारी करत होते. त्यात डॉ. ज्योती मेटे, बजरंग सोनवणे, बी. बी. जाधव, डॉ. अशोक थोरात यांच्या नावांचीही भर पडली.

Jyoti Mete - Sharad Pawar- Pankaja Munde
Pankaja Munde News : पंकजा मुंडेंसाठी नगरमधील ‘मावशी’ बीडच्या मैदानात उतरणार

ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व डॉ. मेटे यांच्यात मागच्या आठ दिवसांपासून संपर्क सुरू होते. जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांत डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) तगड्या उमेदवार ठरू शकतात, असा मतप्रवाह पक्षात तयार झाला. त्यानंतर मंगळवारी शरद पवार व डॉ. ज्योती मेटे यांची भेट झाल्यानंतर त्यांना उमेदवारीबाबत ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची खात्रिलायक माहिती आहे.

दरम्यान, अंबाजोगाईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बुधवारी नियोजित बैठक ऐनवेळी रद्द केल्याने डॉ. मेटेंची उमेदवारी फायनल झाल्याला अधिकच दुजोरा मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बुधवारी पुण्यात बीड लोकसभा निवडणुकीबाबत होणाऱ्या बैठकीत हा प्रवेश होणार आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीतील इतरही दुसऱ्या फळीतील एखादा नेता प्रवेश करू शकतो. सुरुवातीला बजरंग सोनवणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांची पुन्हा अजित पवारांसोबत बैठक झाल्याने त्यांची व शरद पवार (Sharad Pawar) गटांमधील बोलणी लांबली. त्यांनतर डॉ. ज्योती मेटे यांचे नाव आघाडीवर आले. आता सोनवणेंचा पक्ष प्रवेश कोणत्या अटीवर व कोणत्या कारणांनी हे लवकरच कळणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Jyoti Mete - Sharad Pawar- Pankaja Munde
Pune Lok Sabha News 2024 : मोठी बातमी! पुण्यातून शरद पवार लढणार, कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com