Baburao Kadam Kohalikar Sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha Constituency : उमेदवार बदलानंतर कोहळीकर यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री हिंगोलीत...

Jagdish Pansare

Hingoli Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपने गेम केल्याचा आरोप केला जातोय. विद्यमान खासदारांना जाहीर केलेली उमेदवारी कापावी लागल्याने मुख्यमंत्री (Eknath Shinde) भाजपसमोर झुकले, असा आरोपही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून (Hingoli) आधी जाहीर केलेली हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलून बाबूराव कोहळीर (Baburao Kohalikar) यांना काल जाहीर झाली.

आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हिंगोलीत दाखल झाले. मोठ्या शक्तिप्रदर्शनात कोहळीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, उमेदवारी कापल्यामुळे नाराज झालेल्या हेमंत पाटलांची मुख्यमंत्री शिंदे समजूत कशी काढणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. Chief Minister Eknath Shinde in Hingoli to give strength to Baburao Kadam Kohlikar after change of candidate

बाबूराव कदम कोहळीर (Baburao Kadam Kohalikar) यांना अनपेक्षितपणे लोकसभेची उमेदवारी (loksabha Candidate) जाहीर झाली. एका सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय. केवळ उमेदवारी जाहीर करून मुख्यमंत्री थांबले नाही, तर हेमंत पाटलांचा पत्ता कट केल्यामुळे नाराज झालेल्या हिंगोलीतील शिवसैनिकांना धीर देत होणारे संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः शिंदे हिंगोलीत दाखल झाल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हिंगोलीतून हेमंत पाटील (hemant Patil) यांची उमेदवारी बदलण्याची मागणी करत बंडाचे निशाण फडकवलेले भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगी शाम भारती (Yogi shyam Bharati) यांनी दोन दिवसांपूर्वी मेळावा घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे भारती यांनी काल मोठ्या शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

आता हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाबूराव कदम कोहळीकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. एवढेच नाही तर त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे योगी शाम भारती माघार घेणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु यानंतरही हेमंत पाटील नाराज असल्याचे बोलले जाते.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT