Beed News: शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला; बीडमध्ये धक्कादायक प्रकार

Beed Shiv Sena Leader Attack News: खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यांच्यासोबतच्या इतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. खांडे हे या मारहाणीत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Beed Shiv Sena Leader Attack News
Beed Shiv Sena Leader Attack NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News:राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. बीड शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे (Dnyaneshwar Khande) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. (Beed Shiv Sena Leader Dnyaneshwar Khande Attack)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, तपास सुरू आहे. बीडजवळील म्हाळस जवळा या गावाकडे जात असताना ज्ञानेश्वर खांडे यांची गाडी अडविण्यात आली. अचानक सात ते आठ जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

ही घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. खांडे हे नेहमीप्रमाणे बीडहून आपल्या गावाकडे निघालेले असताना बीडपासून जवळच काही अंतरावर त्यांच्या गाडीला काही जणांनी अडवले.

Beed Shiv Sena Leader Attack News
Who is Karan Pawar: जळगावमधून ठाकरे गटाकडून लोकसभा लढविणारे करण पवार आहेत कोण ?

खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यांच्यासोबतच्या इतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. खांडे हे या मारहाणीत गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

R

Beed Shiv Sena Leader Attack News
Vishwajit Kadam News: सांगलीसाठी माझा हट्ट अन् आग्रह, तातडीने निर्णय घ्या, विश्वजित कदमांचा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com