Marathwada Political News : राज्य सेवेत काम केल्यानंतर आपली दुसरी इनिंग राजकारणातून सुरू करणारे अनेक अधिकारी राज्यात आणि देशात पाहायला मिळतात. याच पंगतीत आता निवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Hingoli Loksabha Constituency) मूळ नांदेड जिल्ह्यातील हदगाव-तामसा भागातील असलेले मोपलवार यांना राज्य शासनाने दिलेली मुदतवाढ काल संपली. त्यानंतर लगेच हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी अवघे चार ते पाच महिने शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू असताना हिंगोली (Hingoli) लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण ? याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत असतानाच सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
ते महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात असले तरी कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार हे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. (BJP) या मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा प्रबळ दावा राहणार आहे. (Marathwada) हिंगोली लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते उत्तमराव राठोड हे सलग तीन वेळा निवडून आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पण त्यानंतर सलग विजय एकाही विद्यमान खासदाराला या मतदारसंघात मिळवता आलेला नाही. या मतदारसंघात दरवेळी मतदार नवीन उमेदवार निवडून देतात हा इतिहास पाहता मोपलवार यांच्या नावाच्या चर्चेला पुष्टी मिळते. या मतदारसंघावर महाविकास आघाडी व महायुतीच्या घटक पक्षाची नजर असून, प्रत्येक पक्ष या जागेवर दावा करीत आहे. महायुतीचे जागावाटप ठरल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली होती.
त्यानुसार भारतीय जनता पक्ष २६, शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना २२ जागा अशी विभागणी करण्यात येणार आहे. यात काही कमी जास्त जागा होऊ शकते, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले होते. असे झाले तर हिंगोलीची जागा भारतीय जनता पक्ष लढवू शकतो. सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे नांदेडचे भूमिपुत्र असून, त्यांचे जन्मगाव तामसा (ता. हादगाव) आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील किनवट, हादगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांनी २००५ ते २००९ या काळात काम पाहिले आहे. तसेच नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
नांदेड शहरातील विकासकामांना त्यांच्या काळात खूप मोठी गती मिळाली होती, शिवाय जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन वर्षांपासून या मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन, शिवसेना शिंदे गट एक, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी एक असे सहा आमदार आहेत.
महायुतीकडे चार आमदार आहेत, ही एक जमेची बाजू असली तरी खासदार हेमंत पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूती आहे. मतदारांचा रोष कमी करण्यासाठी ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर दुसरीकडे यंदा वसमतचा खासदार करायचा, अशी मतदारात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटली, तर माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे सक्षम उमेदवार होऊ शकतात. तसे झाले तर एक सहकार क्षेत्रातील दिग्गज व एक प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकारी अशी लढत पाहण्यास मिळेल.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.