Radheshyam Mopalwar: मोपलवारांना पदावरून हटवलं; पण आता शिंदे सरकारचा 'हा' मोठा खुलासा

MSRD Radheshyam Mopalwar : मोपलवारांना निवृत्तीनंतरही तब्बल सात वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
Radheshyam Mopalwar
Radheshyam MopalwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता त्यांच्या जागेवर अनिल गायकवाड यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. मोपलवारांना पदावरून हटवण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्यानंतर आता राज्य सरकारने मोठा खुलासा केला आहे.

मोपलवार यांना या पदावर यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता मोपलवार यांच्याच विनंतीवरून त्यांनी या पदावर आणखी मुदतवाढ घेतली नाही. त्यामुळे मोपलवारांना या पदावरून हटवलं, असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar: वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या मोपलवारांना निवृत्तीनंतरही का मिळाली होती सात वेळा मुदतवाढ ?

मोपलवार हे 2018 मध्ये आपल्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले होते, पण निवृत्तीनंतरही मोपलवारांना तब्बल सात वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत होते. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.

मोपलवार यांच्यावर 2017 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. भ्रष्टाचाराची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. यानंतर त्यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी मोपलवारांच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली होती.

पुढे या समितीने त्यांना क्लीन चिट दिली आणि त्यांना डिसेंबर 2017 मध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. दरम्यान, एकूणच मोपलवार यांची प्रशासकीय सेवा ही एक वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत राहिलेली आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar:...अखेर मुख्यमंत्री शिंदेंनी मोपलवारांना हटवलं; समृद्धी महामार्गात निभावली होती महत्त्वाची भूमिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com