Mp Hemant Patil News Sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil News: तिकीट कापल्यानंतर हेमंत पाटील मुख्यमंत्र्यांवर नाराज; आज घेणार मोठा निर्णय

Hingoli Loksabha Constituency 2024: वाशीम- यवतमाळ लोकसभेसाठी राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा किंवा नाही, याचा निर्णय कुटुंबामध्ये अद्याप झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. माझी उमेदवारी पक्षाने अगोदर जाहीर करायला नको होती असे हेमंत पाटील म्हणाले.

Mangesh Mahale

Hingoli Lok Sabha Constituency News: महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर(Baburao Patil Kohlikar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वाशीम- यवतमाळ लोकसभेमध्ये विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट केला आहे, त्या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयावरून हेमंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राजश्री पाटलांचा अर्ज भरायचा का नाही, याचा निर्णय हेमंत पाटील आज घेणार आहेत. (Hingoli Lok Sabha Constituency 2024 News update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाला हेमंत पाटील यांनी विरोध केला आहे. वाशीम-यवतमाळ लोकसभेसाठी राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा किंवा नाही, याचा निर्णय कुटुंबामध्ये अद्याप झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. माझी उमेदवारी पक्षाने अगोदर जाहीर करायला नको होती, असे हेमंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशीम-यवतमाळ लोकसभेत राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, हेमंत पाटील यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे आता सगळ्याचे लक्ष लागले आहे.

यवतमाळ -वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे, तेथे राजश्री हेमंत पाटील यांचा प्रचार रथ दाखल झाल्याने जवळपास राजश्री पाटील याच महायुतीच्या उमेदवार असल्याचे चित्र आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT