Nagesh Aashtikar  sarkarnama
मराठवाडा

Hingoli Loksabha Constituency: देवदर्शन घेत अखेर महाविकास आघाडीचे आष्टीकर लागले प्रचाराला...

Loksabha Election 2024 : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात होत आहे. एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असेही स्वरुप या निवडणुकीला आले आहे

Jagdish Pansare

Hingoli News : शिवसेना-राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्या लोकसभा निवडणुकीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात होत आहे. एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असेही स्वरुप या निवडणुकीला आले आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. (Hingoli Loksabha Election 2024)

हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर विरुद्ध महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात लढत होत आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षा एकाच पक्षात काम करणारे हे जुने शिवसैनिकच आता एकमेकांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Aashtikar) यांनी आज माहूरच्या रेणुका माता, दत्तशिखर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे.

राज्यावर आलेलं संकट दूर करण्याची ताकद आई देईल, मतदारांची साथ आणि रेणुका आईचा आशीर्वाद हीच ताकद हिंगोली लोकसभा मतदारसंघात आपल्याला विजय मिळवून देईल, असा विश्वास आष्टीकर यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे(Mahavikas Aaghadi) आमदार व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विरोधकांना कितीही टीका करू द्या, शेवटी मतदान जनता करणार आहे, तेच ठरवतील दिल्लीत कोणाला पाठवायचे आणि घरी कोणाला बसवायचे, असा टोला आष्टीकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार बाबुराव कदम यांना लगावला.

हिंगोलीतील लढाई ही निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी आहे. बाबुराव कदम यांना तर अनपेक्षितपणे लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. हेमंत पाटील यांनी तरी खासदार म्हणून जिल्ह्यात काही कामे केली होती, पण त्यांना त्यांच्याच लोकांनी विरोध केला. बाबुराव कदम यांनी मी विधानसभेला तिसऱ्या क्रमाकांवर होतो, ते आमच्यासमोर टीकूच शकत नाही, अशी किती टीका केली तरी हे जनता ठरवेल, तुम्हाला तो अधिकार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे त्यांचे सध्या सल्लागार आणि प्रचारप्रमुख असल्याने त्यांचा परिणाम बाबुराव कदम यांच्यावर झाला आहे. यातूनच ते अशी भाषा वापरत आहेत, पण त्यावर स्पष्टीकरण देण्यात मी वेळ घालवणार नाही. तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारा ते तुम्हाला खरे चित्र सांगतील, असे आवाहन आष्टीकर यांनी केले.

हिंगोली लोकसभेची जागा शिवसेना (Shivsena) जिंकणारच, असा दावा करतांना येथील जनता गद्दारांना थारा देणार नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीमुळे आमची ताकद वाढली आहे, या उलट महायुतीच्या उमेदवाराला कोणी ओळखतही नाही, अशी टीकाही आष्टीकरांनी करत त्यांना आव्हान दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT