Nashik Political News : महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात पक्षाचे बहुतांश पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सध्या नाशिक Nashik शहरात त्यांच्या प्रचार फेऱ्या सुरू आहेत. मात्र या सर्व प्रचारापासून माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर अलिप्त आहेत. ते अद्याप प्रचारात सहभागी झालेले नाहीत. या निमित्ताने शिवसेनेतील Shivsena गटबाजी चर्चेत आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यावर नाशिक लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर ( Vijay karanjkar) यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठरेल, अशी डरकाळी करंजकर यांनी फोडली होती.
दोन दिवसांत अपेक्षित असलेली ही भेट अद्याप झालेली नाही. मातोश्री कडून करंजकर यांना गेल्या दहा दिवसांपासून वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे करंजकर यांची उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी होणारी भेट झालेली नाही. या भेटी अभावी ते प्रचारात सहभागी झालेले नाहीत. करंजकर यांच्या घोषणेमुळे उमेदवार वाजे आणि त्यांचे समर्थक देखील गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्याचा निवडणुकीच्या प्रचारावर परिणाम होतो की काय अशी भीती आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना उमेदवाराचा प्रचार सुरू असताना या प्रचाराची मुख्य जबाबदारी असलेले करंजकर मात्र तीर्थटनाला गेले होते. एकीकडे शिवसेनेचा प्रचार आणि दुसरीकडे देव देव करणारे करंजकर याचे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. करंजकर यांच्या या भूमिकेमुळे माजी आमदार योगेश घोलप यांसह अन्य समर्थकांचीही मोठी गैरसोय झाली आहे. खरोखर करंजकर यांना ठाकरे यांच्या भेटीत रस आहे की वेगळेच काहीतरी करण्याचे त्यांच्या मनात आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
या कालावधीत अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क करून थेट प्रचारात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र करंजकर यांनी अद्याप कोणालाही प्रतिसाद केला नाही. त्यामुळे करंजकर शिवसेनेत अस्वस्थ तर नाही ना?. दुसरा काही विचार त्यांच्या मनात आहे की काय? असे बोलले जात आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.