Hemant Patil Sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil: खासदार हेमंत पाटलांना लंडनहून धमकी; पन्नू म्हणाला,'भारतात मोठा स्फोट करणार...'

Mangesh Mahale

Nanded News : खासदार हेमंत पाटील यांना लंडनहून धमकीचा फोन आला असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड येथील यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. याबाबत हेमंत पाटील यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दिली आहे.

खासदार पाटील यांना लंडनहून खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून धमकीचा फोन आला आहे. 26 जानेवारीला दिल्लीत होणारा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी यातून दिली आहे. धमकी देणारी व्यक्ती इंग्रजीत बोलत होती. त्याने बोलताना स्वतःचे नाव पन्नु सांगितले. 26 जानेवारीला भारतात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली. 'तुम्हाला स्वतःला वाचवायचे असेल तर वाचवा' अशी धमकी त्याने दिली आहे.

'14 डिसेंबरला मला पाहिला फोन आला. तो इंग्रजीत बोलत होता. देशात स्फोट घडवणार असल्याचं सांगितलं. 15 तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना धमकीविषयी सांगितले. पुन्हा 20 तारखेला फोन आला, तो मी उचलला नाही. त्यामुळे मी लगेच दिल्लीत वरिष्ठांना पत्र लिहिलं. त्यांच्या कार्यालयाला मी माझं पत्र दिलं आहे,' असे पाटील यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार पाटील यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धमकीबाबत कळवले आहे. पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नूकडून खासदारांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दोन वेळा धमकीचा फोन आला होता.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT