Nagpur NDCCB Bank : शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच सुनील केदार आजारी

Sunil Kedar Hospitalised: डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात उपचार सुरू
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना काल (शनिवारी) नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक (NDCCB) घोटाळाप्रकरणी पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर केदार यांना अचानक काल रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुनील केदार यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास झाला. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी ECG काढला आहे. अतिदक्षता विभागामध्ये सुनील केदार यांच्या अन्य चाचण्या केल्या जात आहेत.

Sunil Kedar
Nagpur NDCCB Bank : घोटाळा भोवला; माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा!

काल (22 डिसेंबर) नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक (NDCCB) घोटाळा प्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या घोटाळ्यात केदार यांना नागपूर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरविले होते. शिवाय साडेबारा लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला. घोटाळा उघडकीस आल्याच्या तब्बल 22 वर्षांनंतर याचा निकाल लागला आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे नेते असून ते माजी मंत्री आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोटाळ्यातील इतर आरोपी मुख्य रोखे दलाल केतन सेठ, तत्कालीन बँक व्यवस्थापक अशोक चौधरी, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांनाही पाच वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. खटल्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांनी 28 नोव्हेंबर 2023 रोजी याप्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. निकालातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी हा निर्णय न्यायालयाने घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com